SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

😍 आज पितृदिन अर्थात फादर्स डे! जाणून घ्या ‘या’ दिवसाचा रंजक इतिहास

प्रत्येकासाठी आई-वडील हे नातं फार स्पेशल असतं. आई हे घराचं मांगल्य असते, तर वडील हे अस्तित्व असतात, असं अनेक ठिकाणी म्हटलं जातं. प्रत्येक वडील आपल्या मुलाच्या भविष्यासाठी दिवस-रात्र मेहनत करत असतात. त्यांच्या सन्मानासाठी आज (19 जून) फादर्स डे साजरा केला जात आहे.

जगभरात या खास दिवशी पुरूषामधला ‘बाप’ माणूस आणि त्याचं प्रत्येक लेकरांसोबत असलेले खास नातं सेलिब्रेट केले जातं. खरं तर आई-बाबा ही प्रत्येकाच्या आयुष्यातील हक्काची खास माणसं असल्याने त्यांचा दिवस, त्यांच्याप्रती कृतज्ञता आणि प्रेम व्यक्त करण्याचा केवळ एक दिवस असू शकत नाही.

पण जवळच्याच व्यक्तींना थॅक्स आणि सॉरी बोलणं कठीण जात असल्याने ऐरवी तुमचं प्रेम वडिलांप्रती व्यक्त करू शकत नसाल तर आजच्या ‘फादर्स डे’ चं औचित्य साधून तुम्ही त्यांना हॅप्पी फादर्स डे म्हणून हा दिवस स्पेशल करू शकता.

‘फादर्स डे’ चा इतिहास :
▪️ पहिल्यांदा 1908मध्ये वेस्ट वर्जिनियामध्ये फादर्स डे साजरा करण्यात आला होता. वेस्ट वर्जिनियामध्ये त्यावेळी एक वाईट घटना घडली होती. एका कोळश्याची खाण अचानक खचली आणि या दुर्घटनेमध्ये तेथील जवळपास 200 पादरी म्हणजेच चर्चमधील फादर्स मृत्यूमुखी पडले.

▪️ दुर्घटनेनंतर रविवारी प्रार्थना सभेमध्ये त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली होती. हा रविवार जून महिन्यातील तिसरा रविवार होता. या प्रार्थना सभेमध्ये हा निर्णय घेण्यात आला की, प्रत्येक वर्षी जूनच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा करून सर्व फादर्सना श्रद्धांजली देण्यात येईल. त्यानंतर वेस्ट वर्जिनियामध्ये काही वर्षांसाठी जूनच्या तिसऱ्या रविवारी फआदर्स डे साजरा करण्यात आला, पण तो इंटरनॅशनल इव्हेंट होऊ शकला नाही.

▪️ अनेक वर्षांनंतर 1909मध्ये अमेरिकेतील एका सिविल वॉरमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या एका शिपायाची मुलगी सोनारा मार्ट डौड हिने जूनच्या तिसरा रविवार फादर्स डेच्या रूपात साजरा करण्याचा आग्रह केला. कारण याच तिवशी तिचे वडिल देशासाठी लढता लढता शहिद झाले होते.

▪️ 1913 मध्ये अमेरिका सरकार समोर फादर्स डे साजरा करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. आणि काही वर्षांनी 1972 मध्ये अमेरेकी सरकारने जूनचा तिसरा दिवस सुट्टीचा दिवस घोषित करून फादर्स डे म्हणून साजरा करावा असे घोषित केले.

▪️ बाबा हा प्रत्येक मुला-मुलीसाठी त्यांचा पहिला सुपाहिरो असतो. मग अशा या सुपर हिरोचा एक दिवस स्पेशल करून त्याला कामाच्या धकाधकीतून थोडं बाजूला काढा आणि यंदाची कोविड परिस्थिती पाहून घरच्या घरी सेलिब्रेशन करा.

Advertisement