SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

Covid : दिल्ली-महाराष्ट्राने देशाचं टेन्शन वाढवले

मुंबई :

भारतात गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोनाच्या महामारीने धुमाकूळ घातला होता. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून कोरोनाची स्थिती काहीशी नियंत्रित होती मात्र आता पुन्हा एकदा कोरोनाच्या चौथ्या लाटेचा उद्रेक होण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये परिस्थिती आता कधीही नियंत्रणाच्या बाहेर जाऊ शकते अशी आहे. दैनंदिन कोरोना रुग्णांमध्ये गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि दिल्ली राज्यात कमालीची वाढ झाली आहे. शनिवारी महाराष्ट्रात 3,883 तर दिल्लीमध्ये 1,534 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

Advertisement

राज्यातील मृत्यूदर हा 1.86 टक्के इतका झाला आहे. राज्यातील एकूण कोरोनाच्या 22,828 सक्रिय रुग्ण संख्या आहे. मुंबईमध्ये सर्वाधिक म्हणजेच 13,613 इतके रुग्ण असून त्यानंतर ठाण्यामध्ये 4869 सक्रिय रुग्ण आहेत. दिल्लीतील एकूण कोरोनाची स्थिती महाराष्ट्राच्या तुलनेत कमी आहे. असं असलं तरी दिल्लीच्या आरोग्य विभागाच्या चिंतेत या निमित्ताने भर पडली आहे. दिल्लीमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या पाच हजारांवर पोहचली आहे. गुजरातमध्ये देखील काहीसा कोरोना वाढत आहे.

शनिवारी गुजरातमध्ये 234 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. गुजरातमध्ये कोरोनच्या नवीन रुग्णांमध्ये कोणाचाही मृत्यू झालेला नाही. मागील 24 तासांमध्ये गुजरातमध्ये 159 रुग्णांनी आजारावर मात केली आहे. गुजरामध्ये सध्या सक्रिय रुग्णांची संख्या एक हजार 261 इतकी झाली आहे.

Advertisement

लोकांच्या निष्काळजीपणामुळे कोरोना सध्या वाढत आहे. लग्नांमध्ये, इतर समारंभांमध्ये त्यासोबतच दैनंदिन जीवनामध्ये लोकं निष्काळजीपणा करत, मास्कचा वापर टाळत आहेत. अजूनही कोरोना संपूर्णतः गेलेला नाही हे नागरिकांनी लक्षात घ्यायला हवं. सध्याच्या कोरोना रुग्णांची वाढ लक्षात घेता, आगामी काळात कडक निर्बंध लागू शकतात अशी शक्यता कित्येक आरोग्य तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

Advertisement