SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘अग्निवीरां’साठी सरकारकडून खास सवलती जाहीर, 4 वर्षांनंतर होणार ‘हे’ फायदे..!

भारतीय सैन्य दलातील भरतीसाठी मोदी सरकारने ‘अग्नीपथ’ (Agnipath) ही योजना जाहीर केली.. मात्र, या योजनेला मोठ्या प्रमाणात विरोध होत असून, ठिकठिकाणी आक्रमक आंदोलने सुरु आहेत. या योजनेनुसार, तरुणांना सैन्य दलात 4 वर्षे सेवा करता येणार आहे, पण 4 वर्षांनंतर काय करायचे, असा सवाल या तरुणांकडून उपस्थित केला जात आहे..

या पार्श्वभूमीवर केंद्र व अनेक राज्य सरकारांनी या ‘अग्निवीरां’साठी अनेक सवलती जाहीर केल्या आहेत. अग्नीपथ योजनेनुसार 4 वर्षे सैन्यात सेवा केल्यानंतर ‘अग्निवीरां’ना केंद्र व राज्य सरकारच्या अनेक नोकऱ्यांमध्ये सवलती मिळणार आहेत. याबाबत सविस्तर जाणून घेऊ या..

Advertisement

‘अग्निवीरां’ना मिळणार ‘या’ सवलती

संरक्षण सेवेत प्राधान्य

Advertisement
  • संरक्षण मंत्रालयाअंतर्गत होणाऱ्या नोकर भरतीत अग्निवीरांना 10 टक्के आरक्षण दिले जाणार आहे. या प्रस्तावाला केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंजुरी दिलीय. भारतीय तटरक्षक दल व ‘डिफेन्स पोस्ट’मध्ये हे आरक्षण लागू असेल.
  • ‘अग्निवीरां’ना संरक्षण क्षेत्रातील 16 कंपन्यांमध्येही प्राधान्याने नोकरी मिळणार आहे. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड, भारत इलेक्ट्रिकल लिमिटेड, बीईएमएल, बीडएल, जीएसएल, एमडीएल, मिधानी, ‘आयओएल’सह अन्य कंपन्यांचा त्यात समावेश आहे.
  • योजनेतील अग्निवीरांना मर्चंट नेव्हीतील प्रशिक्षणाचा लाभ दिला जाणार असल्याचे भारतीय नौदलाने जाहीर केलंय. भारतीय नौदलानं प्रमाणित केलेल्या मर्चंट नेव्हीत त्यांना पाठवलं जाईल. तसेच वेगवेगळ्या पदांवरही तैनात केलं जाईल.

गृह मंत्रालय देणार प्राधान्य

केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (CAPF) व आसाम रायफल्समधील (Assam Rifels) भरतीत ‘अग्निवीरां’साठी (Agniveers) 10 टक्के आरक्षण देण्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्रालयाने केली आहे. अग्निवीरांना या दोन्ही दलातील भरतीसाठी उच्च वयोमर्यादेपेक्षा 3 वर्षे अधिक सूट देण्यात येईल. तसेच पहिल्या तुकडीसाठी उच्च वयोमर्यादेची अट 5 वर्षे शिथिल असेल.

Advertisement

शिक्षणाची विशेष सोय

सैन्यात सेवा करतानाच ‘अग्निवीरां’ना त्यांचे शालेय शिक्षणही सुरु ठेवता येणार आहे. त्यासाठी शालेय शिक्षण व साक्षरता मंत्रालयानं ‘अग्निवीरां’साठी विशेष कोर्स सुरू करण्याची घोषणा केलीय. त्यामुळे ‘अग्निवीरां’ना बारावीची परीक्षा देता येईल, तसेच पुढील शिक्षणही घेता येईल. या संस्थेच्या प्रमाणपत्राला नोकरी व उच्च शिक्षणासाठी देशभर मान्यता असेल.

Advertisement

शिक्षण मंत्रालयानं ‘अग्निवीरां’साठी 3 वर्षांचा खास पदवी अभ्यासक्रम तयार केला आहे. या अभ्यासक्रमाची अंंमलबजावणी इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाकडून केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली..

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement