SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आता गावातही पोस्ट ऑफिस होणार? करता येणार ‘ही’ सर्व कामे..

माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाची एक युनिट असलेल्या कॉमन सर्व्हिस सेंटरने (Common Service Centre) पोस्ट विभागाशी एक मोठा करार केला आहे. या अंतर्गत डाक मित्र सेवा (Dak Mitra Seva) सुरू करणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील ग्रामस्तरीय उद्योजकांना आपल्या उद्योगासाठी चालना देता येणार आहे.

स्पीड पोस्ट सीएससीमध्ये बुक होणार..

Advertisement

ग्रामीण भागात स्पीड पोस्ट आणि नोंदणीकृत पार्सल बुक करता येणार आहे. हे करण्यासाठी कॉमन सर्व्हिस सेंटरच्या सेंट्रलाईज्ड डिस्टल सेवा पोर्टलचा वापर केला जाईल.

स्पीड पोस्ट आणि नोंदणीकृत पार्सल फक्त गावांत असणाऱ्या सीएससीमध्ये बुक केले जाणार आहेत. बुकिंग केल्यानंतर कॉमन सर्व्हिस सेंटरच्या ग्रामीण उद्योजकांद्वारे स्पीड पोस्ट आणि पार्सल जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये वितरित केले जातील, अशी माहीती आहे.

Advertisement

खेड्यांतील लोकांना स्पीड पोस्ट (Speed Post) आणि पार्सल बुकिंग करण्यासाठी दूरच्या गावांमध्ये आणि शहरांमध्ये जाण्याची आवश्यकता नसणार आहे. तो देशभरात पसरलेल्या 4.5 लाखांहून अधिक CSC सेंटरमध्ये जाऊन आपले पार्सल आणि स्पीड पोस्ट बुक करू शकणार आहेत.

ग्रामीण भागातील लोकांना फायदा:

Advertisement

कॉमन सर्व्हिस सेंटरचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश त्यागी यांनी म्हटलं की, या सेवेचा ग्रामीण भागातील लोकांना जास्त फायदा होईल. यामुळे ग्रामीण क्षेत्रातील टपाल विभागाचा व्यवसाय वाढण्यास मदत होईल. लोकांना पार्सल आणि स्पीड पोस्ट बुक करायचं असल्यास दुर्गम भागात जाण्याची गरज नसेल. ते म्हणाले की, “हा करार कॉमन सर्व्हिस सेंटर आणि इंडिया पोस्ट या दोघांसाठी फायद्याचा असणार आहे. महत्वाचं म्हणजे याद्वारे गावामध्ये जर कोणी कॉमन सर्व्हिस सेंटर चालवत असेल तर उद्योजकांनाही उत्पन्न मिळण्यास सुरुवात होईल. तर टपाल विभागाचे उत्पन्नही त्यांच्यामार्फत बुक केलेल्या अतिरिक्त पार्सल आणि स्पीड पोस्टच्या रूपाने वाढीस लागणार आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement