दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाने (IND vs SA) जबरदस्त कमबॅक केलं आहे. भारताने राजकोट (Rajkot) येथील सौराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या मैदानावर झालेल्या सामन्यात 82 धावांनी विजय मिळवला आहे. या विजयामुळे दोन्ही संघ मालिकेत आता 2-2 ने बरोबरीत आहेत. आता येत्या रविवारी होणारा पाचवा सामना निर्णायक ठरणार आहे. दक्षिण आफ्रिकेने पहिले दोन टी 20 सामने जिंकल्यामुळे भारत 2-0 असा पिछाडीवर होता. पण विशाखापट्टनममधील तिसरा आणि काल झालेला चौथा सामना जिंकल्याने भारतीय संघाचं जोरदार कमबॅक केलंय.
प्रथम फंलदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने 20 षटकांत 6 बाद 169 धावा करत दक्षिण आफ्रिकेपुढं 170 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. भारताच्या 170 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा डाव 17 षटकात 87 धावात ढेपाळला. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांचा भारताच्या गोलंदाजांनी धुव्वा उडवत अवघ्या 87 धावांवर आफ्रिकेचा संघ गारद झाला. आफ्रिकेकडून रासी व्हॅन डर डसेन (20), क्विंटन डीकॉक (14) आणि मार्को यान्सेन (12) या आफ्रिकेच्या केवळ तीन फलंदाजांना दोन अंकी धावसंख्या करता आली.
हार्दीक पंड्या (Hardik Pandya & Dinesh Karthik) आणि दिनेश कार्तिकच्या जबरदस्त फटकेबाजीमुळं भारताला 169 धावांपर्यंत मजल मारता आली. भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आफ्रिकेच्या फलंदाजांचा धुव्वा उडवत असतानाच दिनेश कार्तिकनेही आक्रमक फलंदाजीला सुरुवात केली. हार्दिकने 31 चेंडूत 3 चौकार आणि 3 षटकार ठोकून 46 धावा फटकारले. तर दिनेश कार्तिकने 2 षटकार आणि 9 चौकारांची चौफेर फटकेबाजी करत 27 चेंडूत 55 धावा केल्या. तत्पूर्वी ईशान किशनने 27 धावा, ऋतुराज गायकवाड 5 धावा, श्रेयस अय्यर 4 धावा, ऋषभ पंतने 17 धावा केल्या.
भारताच्या गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेसमोर मोठं आव्हान उभं केलं होतं. भारताच्या वेगवान आणि फिरकी गोलंदाजांनी यावेळी अचूक आणि भेदक मारा केला. भारताचा वेगवान युवा गोलंदाज आवेश खानने तगडी कामगिरी करत 4 विकेट्स घेतल्या. तसेच आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात आपल्या फिरकीची जादू दाखवणाऱ्या युजवेंद्र चहलनेही दांडी गुल केली, त्याने 2 विकेट्स घेत भारताची वाटचाल विजयाच्या दिशेनं नेली. तसेच हर्षल पटेल आणि अष्टपैलू अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक विकेट घेत विजयात महत्वाचा वाट उचलला.
असे होते संघ…
भारत: ऋषभ पंत (कॅप्टन), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, आवेश खान.
दक्षिण आफ्रिका: टेंबा बावुमा (कॅप्टन), ड्वेन प्रिटोरियस, रासी वॅन डर डुसे, हेनरिख क्लासेन, डेविड मिलर, केशव महाराज, तबरेज शम्सी, एनरिख नॉर्खिया, क्विंटन डि कॉक, मार्को जॅनसेन, लुंगी एनगीडी.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy