SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

मतदान कार्डविषयी मोठा निर्णय..!

केंद्र सरकारने मतदार ओळखपत्राला (Voter ID) आधार लिंक करण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. पॅनकार्डसोबत आधार लिंक करणे (PAN-Aadhar Link) अनेक दिवसांपासून सरकार सांगत आहे. आता मतदार ओळखपत्राशीही आधार (Aadhaar) लिंक करणं आवश्यक आहे. याबाबत सरकारने शुक्रवारी चार अधिसूचना जारी केल्याचं समजतंय.

मतदार यादीशी आधार लिंक करणे, सेवा मतदारांसाठी मतदार यादी (Voter List) लिंग-सुसंगत करणे याशिवाय तरुण मतदारांना वर्षातून एकऐवजी चार वेळा मतदार यादीत नाव नोंदवण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय निवडणूक प्रक्रियेतील बोगस मतदानाला आळा बसू शकतो.

Advertisement

कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी ट्वीट करत दिली माहीती..

देशातील नागरीकांच्या मतदार यादीचा डेटा आधार इकोसिस्टमशी जोडला की, एकच व्यक्ती वेगवेगळ्या ठिकाणी एकापेक्षा जास्त मतदार ओळखपत्रे वापरू शकणार नाही. यामुळे एकाहून अधिक ठिकाणी मतदार यादीत नाव नोंदवण्यापासून रोखले जाईल. मतदार यादीला आधार लिंक केल्यामुळे एकाच व्यक्तीच्या वेगवेगळ्या ठिकाणी होणाऱ्या नाव नोंदणीचे गैरप्रकार रोखता येतील, असे कायदामंत्र्यांनी सांगितले.

Advertisement

मंत्री रिजिजू म्हणाले की, आता 1 जानेवारी किंवा 1 एप्रिल किंवा 1 जुलै किंवा 1 ऑक्टोबर रोजी 18 वर्षे पूर्ण होणारे तरुण मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी तात्काळ अर्ज करू शकतात. यापूर्वी वर्षातून एकदाच ही सुविधा मिळायची. आता वर्षातून चार वेळा नाव नोंदणी करण्यासाठी वेळ दिला जाणार आहे.

सेवा मतदारांचा विचार करून निवडणूक कायद्यात त्यांच्या सोईच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. सैनिकांसारखे सेवा मतदार हे निवडणूक काळात दूर अंतरावर असतील किंवा किंवा परदेशात भारतीय मिशनचे सदस्य हे सेवा मतदार म्हणून गणले जाणार आहेत. याशिवाय सर्वात महत्वाचं म्हणजे लिंगभाव विषमता काढून टाकण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याने “पत्नी” हा शब्द “जोडीदार” या शब्दाने बदलला जाईल ज्यामुळे लिंगभाव विषमता नष्ट होण्याचा प्रयत्न आहे.

Advertisement

निवडणुकीदरम्यान सोयीसाठी निवडणूक आयोगाला महत्वाचे अधिकार दिले गेले आहेत. निवडणूक आयोग आता निवडणूक संबंधित साहित्य ठेवण्यासाठी आणि सुरक्षा दल व निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी कोणत्याही जागेची अथवा इमारतीची मागणी करण्याची शक्यता आहे. संसदेने पारित केलेल्या निवडणूक सुधारणा कायदा 2021 अंतर्गत ही अधिसूचना जारी करण्यात आली आहे, अशी माहीती आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement