गेल्या वर्षाच्या (2021) अखेरीस टेलिकाॅम कंपन्यांनी रिचार्ज प्लॅनच्या किंमती वाढवल्या होत्या.. त्यानंतर टेलिकाॅम कंपन्यांनी दिवाळीपर्यंत पुन्हा एकदा 10 ते 12 टक्के दरवाढ केली जाणार असल्याचे जाहीर केले होते.. मात्र, दिवाळी दूर असतानाच, टेलिकाॅम कंपन्यांकडून दरवाढीचे फटाके फोडण्यास सुरवात झाली आहे..
‘रिलायन्स जिओ’ने (Jio) नुकतीच ‘जिओ’ फोनच्या तीन रिचार्ज प्लॅनच्या किंमतीत 20 टक्के वाढ केली. त्यानंतर ‘जिओ’च्या पावलावर पाऊल ठेवत, ‘एअरटेल’ कंपनीनेही आपल्या ग्राहकांना दरवाढीचा शाॅक दिला आहे.. भारती एअरटेलने (Airtel) आपल्या रिचार्ज प्लॅन्सच्या किंमती वाढवल्याने ग्राहकांना जादा पैसे मोजावे लागणार आहेत.
इतर टेलिकाॅम कंपन्यांप्रमाणेच ‘एअरटेल’ने गेल्या वर्षाच्या अखेरीस आपल्या प्रीपेड प्लॅनच्या किंमतीत वाढ केली होती. नंतर ‘पोस्टपेड प्लॅन’मध्ये दरवाढ केली. त्यानंतर आता पुन्हा एकदा ‘एअरटेल’च्या रिचार्ज प्लॅनसाठी ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ बसणार आहे.. नेमकी कोणत्या प्लॅनमध्ये ही दरवाढ झालीय, हे जाणून घेऊ या..
कोणत्या प्लॅनमध्ये दरवाढ..?
एअरटेलने काही दिवसांपूर्वी 999 रुपयांचा प्लॅन सादर केला होता. त्यात 100 जीबी डेटा मिळत होता. तसेच, त्यात प्रत्येक अॅड-ऑनसाठी 30 जीबी डेटा मिळेल. वापरकर्त्यांना दररोज 200 जीबी डेटा रोलओव्हर, अमर्यादित व्हॉईस कॉलिंग व रोज 100 ‘एसएमएस’ची सोय होती..
‘एअरटेल’कडून नुकताच 1199 रुपयांचा प्लॅन सादर करण्यात आला. या प्लॅनमध्येही 999 रुपयांप्रमाणेच सेवा मिळतेय. मात्र, नवीन प्लॅनची किंमत जास्त आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना काय सेवा मिळणार, हे जाणून घेऊ या..
- ‘एअरटेल’च्या प्लॅनमध्ये महिन्याला 150 जीबी डेटा मिळणार आहे. या प्लॅनमध्ये आणखी दोन कनेक्शनही जोडता येतील.
- तसेच ‘अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग’ची सुविधा मिळेल. ही सुविधा दोन्ही अॅड-ऑन वापरकर्त्यांसाठीही असेल.
- दररोज 100 ‘एसएमएस’ मोफत मिळणार आहेत.
- यूजर्सला ‘एअरटेल थँक्स प्लॅटिनम रिवॉर्ड’ मिळेल. म्हणजेच, या प्लॅनसह ग्राहकांना ‘नेटफ्लिक्स (Netflix)चे मूळ मासिक सबस्क्रिप्शन, अमेझाॅन प्राईम (Amazon Prime)चे 6 महिने सदस्यत्व, तसेच डिस्ने प्लस हाॅटस्टार (Disney Plus Hotstar)चे 1 वर्षांसाठी मोबाईल सबस्क्रिप्शन मिळेल.
- शिवाय, या प्लॅनमध्ये विंक म्युझिक प्रीमियम (Wink Music Premium)चे सबस्क्रिप्शन मिळेल.
टेलिकॉम टॉकच्या रिपोर्टनुसार, ‘एअरटेल’च्या या नवीन प्लॅनमध्ये दिल्या जाणाऱ्या या सर्व सुविधा याआधीच्या 999 रुपयांच्या प्लॅनमध्येही मिळत होत्या.. मात्र, त्यासाठी ग्राहकांना 200 रुपये अधिक मोजावे लागणार आहेत..