SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट; मिळणार ‘या’ सवलतींचा भरघोस फायदा

मुंबई :

केंद्रीय कर्मचाऱ्यांवर आता सवलतींचा वर्षाव होणार आहे. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना संगणक खरेदी करण्यासाठी आता केंद्र सवलत देणार आहे. याबाबत सरकारतर्फे घोषणा करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना आयपॉड, संगणक, टॅब, खरेदी करण्यासाठी व्याजदरानं अग्रीम रक्कम मिळणार आहे.

Advertisement

संगणकाची खरेदी करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे कर्मचाऱ्यांना वार्षिक 9.8 टक्के दराने व्याज उपलब्ध होणार आहे. त्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्याचं संगणक विकत घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे. वैयक्तिक संगणकाच्या व्याख्येत आयपॉडचा देखील समावेश करण्यात आला आहे.

केंद्रीय अर्थ विभागानं दिलेल्या माहितीनुसार अधिकरी-कर्मचारी आपल्या वैयक्तिक वापरासाठी आयपॉडची खरेदी करू शकतात. आयपॉड खरेदीच्या निर्णयाविषयी काहीसा संभ्रम पसरला होता, मात्र केंद्राने निर्णय घेतल्यामुळे आता यामाध्ये कसलाही संभ्रम नाही. केंद्राच्या वतीनं जाहीर केलेल्या अधिसूचनेत आगाऊ रक्कम योजनेची माहिती देण्यात आली आहे.

Advertisement

वर्ष 2022-23 यासाठी 9.8 टक्के इतका व्याजदर निश्चित करण्यात आला आहे. वर्ष 2016 मध्ये केंद्र सरकारनं 50 हजार रुपये किंवा संगणकाची किंमत यापैकी कमी असणारी रक्कम आगाऊ स्वरूपात देण्याचा निर्णय घेतला आहे.

एवढंच नाही तर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनावर परिणाम करणाऱ्या फिटरमेंट फॅक्टरमध्ये वाढ करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. केंद्राने घेतलेल्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात घसघशीत वाढ झाली आहे. सध्याच्या 2.57 टक्के फिटरमेंट फॅक्टरवरून आता 3.68 टक्के इतकी वाढ करण्यात आली आहे. जून महिन्याच्या अखेरपर्यंत या संदर्भातील घोषणा होऊ शकते असं देखील बोलण्यात येत आहे.

Advertisement