SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

रेल्वेमध्ये एका वर्षात होणार 1.5 लाखांची पद भरती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या दीड वर्षात 10 लाख रिक्त पदांची भरती करण्याची घोषणा केल्यानंतर, रेल्वे भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांमध्ये एक आशा निर्माण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनंतर, रेल्वे मंत्रालयाने पुढील एका वर्षात 1 लाख 48 हजार 463 रिक्त पदांवर भरती करण्याची घोषणा केली आहे.

यासह रेल्वे मंत्रालयाने एका निवेदनात असे म्हटले आहे की, गेल्या 8 वर्षांत रेल्वेने वार्षिक सरासरी 43 हजार 678 नोकऱ्या दिल्या असून रेल्वेमध्ये सुमारे 15 लाख पदे मंजूर आहेत. मार्च 2022 मध्ये, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात सांगितले होते की, रेल्वेमध्ये एकूण 2 लाख 98 हजार 428 पदे अजूनही रिक्त आहेत. तर रेल्वेमध्ये एंट्री लेव्हल पदांवर 1.49 लाख जागा रिक्त असून झोननिहाय बोलायचे झाले तर उत्तर रेल्वेत सर्वाधिक 19183 पदे रिक्त आहेत.

Advertisement

दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या निर्देशानंतर विविध विभाग आणि मंत्रालयांना रिक्त पदांचा तपशील तयार करण्यास सांगण्यात आले आणि एकूण आढावा घेतल्यानंतर 10 लाख लोकांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानुसार रेल्वे मंत्रालय 1 लाख 48 हजार 463 रिक्त पदे भरणार आहे. रेल्वेमध्ये अनुसूचित जातीची 4445, अनुसूचित जमातीची 4405 आणि ओबीसींची 5403 पदे रिक्त आहेत.

Advertisement