SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries): दारू किंवा सिगारेटचे खूप जास्त सेवन करणे आज तुमच्या आरोग्याच्या स्थितीला खराब करू शकते. मनाची चंचलता जाणवेल. प्रगल्भ विचार मांडाल. गोड बोलून कामे साध्य करावीत. शाळा सुरू झाल्या आहेत मुलांसाठी मनपसंद खरेदी करावी लागेल. लोकांना सहकार्य कराल. सज्जनांच्या सहवासाने मन प्रसन्न होईल. अडकलेले पैसे परत मिळू शकतात.

वृषभ (Taurus): उगाच चिडचिड करू नका. काम आणि वेळ यांची सांगड घालण्याचा प्रयत्न करावा. सारासार विचार करण्यावर अधिक भर द्याल. हलका आहार घ्यावा. आवडते खेळ खेळाल. कोणतीही गोष्ट अती करू नका. अनावश्यक खर्च टाळा. संयमी वृत्तीमुळे मोठी कामे होतील. मागील गुंतवणुकीमध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे. नोकरीत पदोन्नतीच्या दिशेने वाटचाल कराल.

Advertisement

मिथुन (Gemini) : नोकरदार मंडळीनो काळजीपूर्वक काम करा. सरकारी कामात पैसे गुंतवण्याची शक्यता आहे. तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी आणि आरामदायक असेल. कामात हयगय करू नका. लाभदायक दिवस. दिवसाची सुरुवात चांगल्या बातमीने होईल. प्रियजनांचा सहवास लाभेल. छोटे प्रवास घडतील. वैवाहिक सौख्य उत्तम. सर्व कामात यश मिळेल.

कर्क (Cancer) : गृहशांतीसाठी शुभ आणि पवित्र दिवस. कामाच्या परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. घरातील सदस्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न कराल. काहीसे हट्टीपणे वागणे ठेवाल. प्रतिष्ठा वाढवणार्‍या घटना घडतील. सेवाकार्य घडेल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. एकमेकांशी सल्ला मसलत करून निर्णय घ्याल. आरोग्याच्या बाबतीत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

Advertisement

सिंह (Leo) : व्यावसायिक जीवनात प्रत्येक बाबतीत तुमची भूमिका स्पष्ट ठेवा. आज व्यवसायाच्या दृष्टिकोनातून सर्व काही ठीक होईल. आज तुम्ही वचनबद्ध असाल. मानापमानाचे प्रसन्न फार मनावर घेऊ नका. मानसिक व शारीरिक आरोग्य सांभाळा. सरकारी कामांमध्ये अडचणी येतील. मनःस्ताप होईल. मनाविरुद्ध घटना घडतील. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस जास्त फायदेशीर राहील.

कन्या (Virgo) : नवीन आव्हानांना धैर्याने सामोरे जा, मार्ग सुकर होईल. जमीन आणि मालमत्तेशी संबंधित कामात यश मिळेल. पैशाच्या व्यवहारात यश मिळेल. किरकोळ दुखापतींकडे दुर्लक्ष करू नका. वाद-विवादामुळे मनःस्ताप होण्याची शक्यता आहे. कामांचे नियोजन आवश्यक आहे. विद्यार्थीवर्गासाठी नम्रता आवश्यक. तुमचे आरोग्य चांगले राहील. कोणाशीही वाद घालू नका.

Advertisement

तुळ (Libra) : नवीन कामात काही अडथळे येऊ शकतात. घाई करण्याऐवजी सौम्यपणे वागा. तुमचे बॉस आणि उच्च अधिकारी तुम्हाला गोंधळात टाकू शकतात. आज शांत राहा-तणावमुक्त राहाल. दोन्ही बाजू समजून निर्णय घ्यावा. आरोग्याची काळजी आवश्यक आहे. गैरसमजातून वादविवाद होतील. पित्ताचे विकार होण्याची शक्यता. नवीन लोकांशी संपर्क साधण्याची संधी मिळेल.

वृश्‍चिक (Scorpio) : अपचनाचा त्रास जाणवेल. वडीलधार्‍यांचा सल्ला विचारात घ्यावा. आजचा दिवस तुमच्यासाठी सक्रिय ऊर्जेचा उभारी देणारा नाही. मनातील गैरसमज काढून टाकावेत. गृहसौख्याच्या द़ृष्टीने अनुकूल दिवस. प्रेम प्रकरणामध्ये यश मिळेल. प्रलंबित कामे मार्गी लागतील. कोर्ट-कचेरीच्या कामांत प्रगती होईल. नवीन प्रकल्पाची जबाबदारी मिळेल.

Advertisement

धनु (Sagittarius) : तुम्ही बँकेकडून कर्ज घेऊ शकता. उधार दिलेले पैसे कुठूनतरी परत मिळू शकतात. संघर्ष फायदेशीर ठरणार नाही. वरिष्ठांची मर्जी राखावी. कृती करण्याआधी संपूर्ण विचार करावा. शत्रूंवर विजय प्राप्त कराल. थोरा-मोठ्यांचे आशीर्वाद लाभतील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. कौतुकास्पद काम कराल. करिअरशी संबंधित नवीन संधी मिळतील.

मकर (Capricorn) : आज नवीन ध्येय निश्चित करा आणि त्यादृष्टीने प्रयत्न सुरू करा. काही व्यावसायिक बाबी तुम्ही हुशारीने हाताळू शकता. पैसा वाढू शकतो. कौटुंबिक संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. पदोन्नतीचे योग संभवतात. मागील गुंतवणुकीमध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे. अतिसाहस करू नका. अनियोजित खर्च वाढतील. नोकरीत यश मिळाल्याने आनंदी राहाल.

Advertisement

कुंभ (Aquarious) : मित्रांशी पैज लावाल. करमणुकीत अधिक वेळ घालवाल. जवळच्या मित्रांचा गोतावळा जमवाल. घरगुती काळजी तुम्हाला बेचैन करेल. विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात व्यस्त राहील. कामांचे नियोजन आवश्यक आहे. विद्यार्थीवर्गासाठी नम्रता आवश्यक. प्रलंबित कामांना गती मिळेल. व्यावहारिक सावधानता आवश्यक आहे. व्यवसायात नफा मिळवण्याच्या अनेक संधी मिळतील.

मीन (Pisces) : क्षुल्लक गोष्टी नजरेआड कराव्यात. आपल्याला आवडत्या गोष्टी करण्यावर अधिक लक्ष द्यावे. दिवस मनाप्रमाणे घालवावा. जबाबदारी व्यवस्थित पार पाडाल. अनावश्यक खर्च उभे राहतील. कलह टाळण्याचा प्रयत्न करावा. कला-गुणांना वाव मिळेल. लेखकांना लाभदायक दिवस ठरेल. व्यावसायिक प्रगती होईल. काही नवीन कमाईच्या संधी देखील मिळू शकतात.

Advertisement