SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ही सोशल साईट करणार महिलांसाठी काम; लाखो रोजगाराच्या संधी होणार उपलब्ध

लिंक्‍डइन या जगातील सर्वात मोठ्या व्‍यावसायिक नेटवर्कने एक महत्वाची घोषणा केली आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी लिंक्‍डइन काम करणार आहे. यासाठी लिंक्‍डइन लैंगिक समानतेशी समर्पित युनायटेड नेशन्‍स कंपनी यूएन विमेनसोबतच्‍या (UN Women) तीन वर्षांच्‍या प्रादेशिक सहयोगामध्‍ये 3.88 कोटी रूपयांची गुंतवणूक करणार आहे. या प्रकल्पाला महाराष्ट्रातून सुरुवात होणार आहे.

या प्रकल्पामध्ये 2,000 महिलांच्‍या डिजिटल, सॉफ्ट आणि रोजगारक्षम कौशल्‍यांना चालना देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. या प्रकल्पांतर्गत महिलांसाठी रोजगार मेळावे, मार्गदर्शन सत्रे या नेटवर्कच्या माध्यमातून करिअर घडविण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलांना कमी प्रमाणात इंटरनेट उपलब्ध होते.

Advertisement

यामध्ये तब्ब्ल 32 टक्‍के इतकी लैंगिक पोकळी दिसून येते. 2013 ते 2017 दरम्‍यान आशियामधील लैंगिक पोकळी 17 टक्‍क्‍यांवरून 24 टक्‍क्‍यांपर्यंत पोहोचली आहे असं इंटरनॅशनल टेलिकम्‍युनिकेशन्‍स युनियने म्हटलं आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलांना, मुलींना डिजिटल युगात कमी आर्थिक संधी मिळतात. त्यातच कोरोनाच्या महामारीत स्त्री, पुरुष पोकळी ही आणखी वाढली होती. हीच पोकळी भरून काढण्यासाठी लिंक्डइन आणि यूएन विमेन या संस्था करणार आहेत.

लिंक्‍डइनचे भारतातील कंट्री मॅनेजर आशुतोष गुप्‍ता यांनी म्हटलं आहे की आम्ही यूएन विमेनसोबत मिळून महिलांना योग्‍य कौशल्‍ये आणि संसाधने यांच्यावर काम करणार आहोत. यामुळे अधिकाधिक समान आणि सर्वसमावेशक टॅलेण्‍ट क्षेत्र निर्माण करण्‍याची आशा केली जाऊ शकते असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

Advertisement

महिला आणि मुलींना उत्तम रोजगार आणि उद्योजक संधी मिळण्‍याकरिता दर्जेदार शिक्षण मिळणे ही काळाची गरज आहे असं यूएन विमेन इंडियाच्‍या देशातील प्रतिनिधी सुझान फर्ग्‍युसन यांनी म्हटलं आहे.

Advertisement