शक्तिमान नाव ऐकलं कि आठवतं ते लहानपण आणि छोट्या पडद्यावरील 90 च्या दशकातील दूरदर्शनवर सुरु असणारी ही वेगळी मालिका. गंगाधर नावाच्या पात्राने गाजवलेली शक्तिमानची भूमिका आपल्यातल्या कित्येकांच्या आज आठवणीत आहे. लहानपणी शक्तिमान पाहताना इतर दुसऱ्या कोणत्या मालिकेची आठवण होत नसे. लहानांपासून मोठ्यांपार्यंत अनेकांनी या शक्तिमानला प्रेम दिलं. आजदेखील लोक या मालिकेला विसरले नाहीयेत. आता नुकतीच एक खुशखबर आली आहे कि, शक्तिमान आता मोठ्या पडद्यावरून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
काही दिवसांपूर्वी सोनी पिचर्स यांनी नुकतीच एक पोस्ट शेअर करून ‘शक्तिमान’ (Shaktimaan) मालिकेवर आधारित असणाऱ्या चित्रपटाची घोषणा केली होती. आता 17 वर्षांनंतर हा शक्तिमान पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. शक्तिमान मालिकेवर चित्रपट निर्मितीची घोषणा प्रसिद्ध अभिनेते शक्तिमान फेम मुकेश खन्ना (Mukesh Khanna) यांनी करत एका मुलाखतीमध्येदेखील याविषयी अधिक माहिती दिली आहे. जगप्रसिद्ध सोनी कंपनीच्या वतीनं या चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे, अशी माहिती आहे.
सध्या ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना हे काही सामाजिक कामांमध्ये व्यस्त आहेत. मोफत शिक्षण व्यवस्था, गरिबांना आरोग्य आणि शिक्षणाच्या सोयी सुविधा मिळाव्यात म्हणून त्यांनी काही प्रोजेक्ट सुरु केले आहेत. येणाऱ्या काही महिन्यातच शक्तिमान, त्याचे चित्रिकरण आणि त्याचे बजेट याविषयी त्यांनी सांगितले आहे.
अभिनेते मुकेश खन्ना म्हणाले…
प्रसिद्ध कंपनी सोनी पिक्चर्सकडून हा चित्रपट प्रेक्षकांसाठी लवकरच प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे बजेट तीनशे कोटींच्या जवळपास आहे. मला शक्तिमानचा दुसरा पार्ट टीव्हीवर घेऊन या, असे बऱ्याच लोकांनी म्हटले होते. पण मला त्यात रस नव्हता. अनेक वर्षानंतर हा प्रोजेक्ट माझ्याकडे आला आहे. लवकरच त्याच्या निर्मितीला सुरुवात होईल. 300 कोटी रुपयांचे बिग बजेट असलेला हा चित्रपट बनायला वेळ लागेल, पण हा चित्रपट देसी संकल्पनेवर आधारित असेल. चित्रपटाची कथा मी माझ्या पद्धतीने तयार केली आहे. माझी एक अट होती की, चित्रपटाची कथा बदलणार नाही. लोक विचारत आहेत, कोण होईल शक्तिमान? तर हा देखील एक मोठा प्रश्न आहे, ज्याचे उत्तर मी सध्या देऊ शकत नाही, पण जर दुसऱ्या कोणी अभिनेत्याने शक्तिमानची भूमिका साकारली तर देश त्याचा स्वीकार करणार नाही हे देखील निश्चित आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy