भारत विरुद्ध द.आफ्रिकामध्ये सामना; भारतासाठी हा विजय अनिवार्य
भारत- दक्षिण आफ्रिकेतील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील चौथा सामना आज खेळला जात आहे. हा सामना राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर संध्याकाळी सात वाजल्यापासून खेळवला जाणार असून या मालिकेत दक्षिण आफ्रिकेच्या संघानं 2-1 नं आघाडी घेतली आहे.
आजचा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा असून मालिका वाचवण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. तर, आजच्या सामन्यात विजय मिळवून दक्षिण आफ्रिकेचा मालिकेवर कब्जा करण्याचा प्रयत्न असेल. तर या सामन्यात भारताकडून 3 प्रमुख बदल होण्याची शक्यता आहे.
हे 3 बदल होण्याची शक्यता
▪️ पहिला बदल : श्रेयस अय्यरऐवजी दीपक हुड्डा
▪️ दुसरा बदल : अक्षर पटेलऐवजी रवी बिश्नोई
▪️ तिसरा बदल : अवेश खानऐवजी उमरान मलिक
भारत- दक्षिण आफ्रिका हेट टू हेड रेकार्ड :
भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत एकूण 18 सामने खेळले गेले. त्यापैकी भारतीय संघानं 10 सामने जिंकले आहेत. तर, आठ सामन्यात पराभव पत्कारावा लागलाय. महत्वाचं म्हणजे, भारतीय संघानं मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सात सामने खेळले आहेत. त्यापैकी दोन सामने जिंकले आहेत. तर, पाच सामन्यात पराभव स्वीकारला आहे.