‘रिलायन्स जिओ’… टेलिकाॅम क्षेत्रातील सध्याचे भारतातील आघाडीचे नाव.. ग्राहकांना स्वस्तात मस्त रिचार्ज प्लॅन देण्यासाठी जिओ ओळखले जाते.. त्यामुळेच अवघ्या काही दिवसांत ‘जिओ’ने मोठ्या संख्येने ग्राहक वर्ग आपल्याकडे खेचण्यात मोठं यश मिळवलं होतं.. मात्र, आता ‘जिओ’ने देशातील कोट्यवधी ग्राहकांना जोरदार धक्का दिला आहे..
‘जिओ’ने आपल्या लोकप्रिय रिचार्ज प्लॅनच्या दरात तब्बल 20 टक्के वाढ केली आहे.. त्यामुळे या प्लॅनच्या किंमती दुप्पट झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी जो रिचार्ज प्लॅन 149 रुपये किंवा त्यापेक्षा कमी किंमतीत मिळत होता, तो आता तब्बल 239 रुपयांवर गेलाय.. शिवाय, प्लॅनच्या मुदतीचे दिवसही ‘जिओ’ने कमी केल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ बसू लागली आहे..
गेल्या काही दिवसांपूर्वी ‘जिओ’ने फिचर फोन लाँच केला होता. ‘जिओ’च्या फोनवर खास प्लॅन ऑफर करण्यात आले होते. जिओ फोन युजर्ससाठीच ते उपलब्ध होते. मात्र, या फोनसाठीच्या तिन्ही प्लॅनमध्ये ‘जिओ’ने वाढ केली आहे. ‘जिओ’ने 20 टक्के सूट देऊन हे प्लॅन ऑफर केले होते. मात्र, आता त्यावरील ‘इन्ट्रोडक्टरी ऑफर’ संपल्याने या प्लॅन्सच्या किंमती वाढल्या आहेत.
कोणत्या प्लॅनमध्ये किती वाढ?
– ‘जिओ’ फोनवरील सर्वात स्वस्त प्लॅन 155 रुपयांचा होता, तो आता 186 रुपये झाला आहे. या प्लॅनमध्ये 28 दिवसांची वैधता, रोज 1 जीबी डेटा, तसेच कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग व रोज मोफत 100 ‘एसएमएस’ची सुविधा दिली जाते.
– तसेच जिओचा 185 रुपयांच्या प्लॅनची किंमत आता 222 रुपये झालीय. या प्लॅनमध्ये रोज 2 जीबी डेटा मिळतो. कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, 100 एसएमएस मोफत आहेत. या प्लॅनची ‘व्हॅलिडीटी’ही 28 दिवसांचीच आहे.
– जिओ फोनवर सर्वाधिक किंमतीचा रिचार्ज प्लॅन होता, 749 रुपयांचा..! हा प्लॅन आता 899 रुपयांवर गेला आहे. या प्लॅनसाठी 12 महिन्यांची व्हॅलिडीटी असून, या काळात 24 जीबी डेटा मिळेल, म्हणजे 28 दिवसांसाठी 2 जीबी डेटा मिळतो. महिना संपल्यावर तो पुन्हा रिन्यू होतो. 28 दिवसांसाठी 50 एसएमएस व फ्री व्हॉईस कॉलिंगचीही सुविधा मिळते.