SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

CIBIL स्कोअर कमीय? तरीही लोन घ्यायचं असेल तर ‘या’ टीप्स करा फॉलो

सध्याच्या काळात कोणतंही लोन म्हणजेच कर्ज घ्यायचं असेल तर एक शब्द आपल्या कानावर नक्की पडत असेल. तो शब्द म्हणजे सिबिल (CIBIL). मुख्यतः CIBIL स्कोअर जर 750 किंवा त्याहून अधिक असेल तरचं बँका कर्ज पुरवतात असं देखील आहे. त्यामुळे आपला CIBIL स्कोअर हा अत्यंत चांगला असणे गरजेचे आहे.

बऱ्याच जणांचं CIBIL हे काही हप्ते न भरल्यामुळे किंवा अन्य कारणामुळे खराब झालेलं असतं. अशा परिस्थितीमध्ये बँक लोन देण्यासाठी टाळाटाळ करते. मोठं लोन जरी मिळत नसलं तरी अशा अनेक बँका आहेत, ज्या कमी CIBIL असलं तरी कमी स्वरूपातलं म्हणजेच अल्प कर्ज देतात.

Advertisement

आपण हे अल्प कर्ज वेळेवर फेडल्यानंतर आपल्या CIBIL स्कोअरमध्ये नक्कीच सुधारणा होते. आपलं CIBIL स्कोअर कधी कधी कर्ज किंवा ईएमआय आणि क्रेडिट कार्ड पेमेंट वेळेवर भरले नसेल तर खराब होतो. आपल्या CIBIL स्कोअरमध्ये सुधारणा करण्यासाठी हे रखडलेले सर्व व्यवहार पूर्ण करा. या सवयी सुधारल्यानंतर नक्कीच CIBIL स्कोअरमध्ये सुधारणा होईल. आपण वापरत असणाऱ्या क्रेडिट कार्डला एक मर्यादा निश्चित केलेली असते.

जर आपण नेहमीच 30% पेक्षा जास्त क्रेडिट लिमिटचा वापर केला तर आपल्याला जास्तीत जास्त क्रेडिट वापरणारी व्यक्ती म्हणून पाहिले जाते. यावरून CIBIL स्कोअरवर चुकीची छाप पडते. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सिबिल स्कोअर 300 ते 900 अंकांच्या दरम्यान असतो. जर आपला CIBIL स्कोअर 750 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर निश्चितच आपल्याला लोन घेण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही.

Advertisement