दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी (ता. 17) ऑनलाईन जाहीर करण्यात आला.. त्यानंतर अनेक विद्यार्थ्यांची पुढील अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याची लगबग सुरु झाली आहे.. मात्र, अनेक विद्यार्थ्यांना घरच्या परिस्थितीमुळे पुढचं शिक्षण घेणं शक्य नसतं.. दहावी झाली की काहींच्या शिक्षणाला ब्रेक लागतो.. तर काही जाॅब करीत करीत पुढील शिक्षण घेतात…
सध्या प्रत्येक क्षेत्रात जाॅबची मारामार आहे. त्यासाठी अनेक जण ‘स्ट्रगल’ करीत असताना, दहावी पास विद्यार्थ्यांना कोण जॉब देणार, असा प्रश्न मनात येऊ शकतो. मात्र, तसं अजिबात नाही. दहावी पास उमेदवारांनाही करियरचे अनेक चांगले पर्याय आहेत. त्यात चांगला पगारही आहे.. अशाच काही पर्यायांबाबत जाणून घेऊ या..
‘या’ क्षेत्रात नोकरीच्या संधी..
सरकारी रोजगाराभिमूख कोर्स
सरकारतर्फे अनेक रोजगाराभिमुख कोर्सेस सुरु आहेत. त्यात टायपिंग, शिवण काम, इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिक, कॉम्प्युटरची देखभाल-दुरुस्तीचे कोर्स करता येतील. अशा अभ्यासक्रमांची माहिती जिल्हा प्रशिक्षण केंद्रातून मिळवू शकता. काही ठिकाणी जिल्ह्याच्या लीड बँकेकडूनही असे अभ्यासक्रम चालवले जातात.
सैन्यात नोकरीची संधी
दहावी पास उमेदवारांना भारतीय लष्करात भरती होता येते. त्यासाठी तुम्ही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणं आवश्यक आहे. भारतीय सैन्यदलात लवकरच भरती होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
रेल्वेतील नोकरी
रेल्वेत नोकरी करण्याची इच्छा असल्यास, त्यासाठी सतत भरती प्रक्रिया सुरु असते. रेल्वेतील नोकरीसाठीही तुम्हाला अर्ज करता येईल. रेल्वेत दहावी पास उमेदवारांसाठीही काही पदे असतात. त्यासाठी वेळोवेळी भरती केली जाते..
बँकेत नोकरीची संधी
बँकिंग क्षेत्रात जाण्याची इच्छा असल्यास, बॅंकांमध्ये अधिनस्थ कर्मचाऱ्यांची भरती केली जाते, ज्यासाठी दहावी पास उमेदवारांची भरती केली जाते. त्यानुसार तुम्ही अर्ज करून बँकेत नोकरी करू शकता.
‘हे’ पर्यायही पाहा
तुम्हाला तांत्रिक ज्ञान घ्यायचे असेल, तर एखाद्या दुकानात किंवा कारखान्यात अनुभवाशिवाय काम करू शकता. तुम्हाला पगार कमी मिळाला, तरी कोणत्याही एका कामात प्रभुत्व मिळवू शकता. कामात प्राविण्य मिळवल्यानंतर तुमचा पगारही वाढू शकतो.