SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

अग्निपथ योजनेच्या ‘या’ नियमांत मोठा बदल, मोदी सरकारचा निर्णय..

भारतीय सैन्य दलातील भरतीबाबत मोदी सरकारने नुकतीच ‘अग्निपथ’ योजना जाहीर केली. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी या योजनेची घोषणा केली. या योजनेनुसार, तरुणांना 4 वर्षांसाठी सैन्यात भरती केले जाणार असून, त्यानंतर त्यातील 80 टक्के जवान निवृत्त होणार आहेत.

मोदी सरकारने ‘अग्निपथ’ योजनेची घोषणा केल्यापासून देशभरातून त्याला विरोध होतोय. 4 वर्षे सैन्य दलात सेवा केल्यानंतर वयाच्या 25 व्या वर्षी जवानास लष्करातून काढून टाकलं जाईल. त्यानंतर हे तरुण कुठे जाणार, असा काहींचा सवाल आहे. सरकार पैसे वाचवण्यासाठी तरुणांच्या भविष्याशी खेळत असल्याचाही आरोप केला जात आहे..

Advertisement

गेल्या दोन दिवसांपासून देशातील अनेक ठिकाणी रस्त्यावर उतरून ‘अग्निपथ’ योजनेला विरोध केला जात आहे. संरक्षण तज्ज्ञांनीही या योजनेबाबत चिंता व्यक्त केलीय. सैनिकांवरील पगार व पेन्शनचा खर्च कमी करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला असला, तरी तिन्ही सेवेतील भरती व प्रशिक्षणाबाबत असे प्रयोग करणं चुकीचं आहे.

चीन-पाकिस्तानसारख्या शत्रूंचा सामना करताना, पूर्ण वेळ सैनिकांची गरज आहे. केवळ 4 वर्षांसाठी सैन्यात भरती झालेल्या सैनिकांमध्ये नियमित सैनिकांप्रमाणे ती जिद्द, तो आत्मविश्वास निर्माण होऊ शकत नाही. नियमित सैनिकांप्रमाणे ते कुशल व शिस्तबद्ध योद्धे बनू शकत नाही, असं अनेक निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

Advertisement

येत्या वर्षभरात अग्निपथ योजनेंतर्गत 96 हजार सैनिकांची भरती केली जाणार आहे. पैकी 40 हजार भरती लष्करासाठी, तर उर्वरित भरती हवाई व नौदलासाठी होणार आहे. पहिली भरती पुढील 90 दिवसांत होऊ शकते. अनेक तरुण लष्करी भरतीच्या प्रतिक्षेत ‘एजबार’ झाले.. त्यामुळे त्यांच्यात निराशा पसरली आहे.

वयाेमर्यादेबाबत मोठा निर्णय..

Advertisement

देशभरात अग्निपथ योजनेला होणारा विरोध लक्षात घेऊन तरुणांचा राग शांत करण्यासाठी मोदी सरकारने सैन्य दलातील भरतीच्या वयोमर्यादेत सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ही सवलत केवळ एकदाच मिळणार आहे. त्यानंतर यापुढील भरती अग्निपथ योजनेच्या (Agnipath Scheme) वयोमर्यादेनुसार होणार असल्याचे सांगण्यात आले..

अग्निपथ योजनेत भरतीसाठी सरकारने वयोमर्यादा 17.5 वर्षे ते 21 वर्षे निश्चित केलीय. मात्र, कोरोनामुळे गेल्या 2 वर्षांपासून सैन्य भरती झालेली नाही. त्यामुळे अनेक तरुणांचे वय उलटून गेलंय. त्यामुळे या तरुणांना दिलासा देण्यासाठी सरकारने तिन्ही सेवांच्या पहिल्या भरतीसाठी 23 वर्षांपर्यंत वयाची सवलत दिली आहे.. अर्थात, वयातील ही सूट एकदाच मिळणार आहे.

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement