SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries): लोकांचा विश्वास संपादन कराल. छोट्याश्या गोष्टींनी नाराज होऊ नका. मान-सन्मान मिळवून देणारी घटना घडेल. पर्यटनाचा आनंद घ्याल. भावनांच्या भरात वाहून नुकसान होण्याची शक्यता आहे. सरकारी कामांना महत्त्व द्या. प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही अपयश येईल. सामान्य स्थितीत मध्यम स्वरूपाची कार्ये पूर्ण होतील. लहान-सहान कामासाठी धावपळ होईल. झोपेची तक्रार जाणवेल.

वृषभ (Taurus): नेतृत्वाची संधी मिळेल. इतरांवर प्रभाव टाकाल. दिवस चांगला आहे. खर्च वाढण्याची आणि तब्येतीच्या कुरबुरी सुरू होण्याची शक्यता आहे. आर्थिक नियोजनावर भर देणे आणि अनावश्यक खर्च टाळून बचत करण्यावर भर देणे आवश्यक आहे. नियम कायदे पाळणे आवश्यक आहे. दुखापतीचा धोका आहे, काळजी घ्यावी. शेअर्स, लॉटरी यांचा अती हव्यास नको. मित्रांचा सहयोग मिळेल

मिथुन (Gemini) : लग्न होण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. अहंकार आणि क्रोधावर नियंत्रण ठेवा. संयम राखा. चुकीच्या मार्गाचा वापर करुन झटपट लाभ मिळविणे टाळा. खोट्या प्रतिष्ठेला बळी पडू नका. कायदा नियम पाळा. वाद टाळणे हिताचे. माणसांशी जुळवून घेणे फायद्याचे. धाडसाला वेगळे वळण लागणार नाही याची काळजी घ्या. आततायीपणे वागणे चुकीचे ठरेल. जास्त खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा.

कर्क (Cancer) : नेतृत्व करण्याची तसेच महत्त्वाचे निर्णय घेण्याची संधी मिळेल. ही संधी साधून आपण स्वतःचे स्थान आणखी बळकट करू शकाल. लोखंड, तेल, दारू या क्षेत्रांशी संबंधित व्यवसायात असलेल्यांची भरभराट होईल. रखडलेली कामं पूर्ण होतील. इतरांवर प्रभाव टाकाल. बोलताना शब्द जपून वापरा. आज तुम्हाला डोक शांत ठेवून विचारपूर्वक कृती करणे आवश्यक आहे. आर्थिक व्यवसायात पैशांचे व्यवहार जपून करा.

Advertisement


सिंह (Leo) : कतृत्वाच्या जोरावर प्रगती कराल. प्रतिष्ठा वाढेल. कौतुक होईल. कष्ट वाढतील पण आर्थिक लाभ होईल. कौतुक होईल. प्रतिष्ठा वाढेल. मान वाढेल. तब्येत जपा. खर्चांवर नियंत्रण ठेवणे आणि वाद टाळणे हिताचे. दिवस बरा जाईल. हुशारीने वागा. दादागिरी टाळा. इतरांचेही ऐकण्याची सवय अंगी बाळगा. तज्ज्ञांचा सल्ला फायद्याचा ठरेल. आजचे काम उद्यावर ढकलू नका. जबाबदारी निभावून नेता येईल.

कन्या (Virgo) : कामाचा व्याप लक्षात घ्यावा. अती श्रमामुळे थकवा जाणवेल. सगळ्यांचे लक्षपूर्वक करण्यात दमून जाल. मनातील इच्छा पूर्ण होईल. घरातील वयोवृद्धांचा मान राखा. थोडा अशक्तपणा वाटेल पण आराम केल्यास उत्साहित वाटेल. आजचा दिवस तुम्हाला आनंदात घालवता येणार आहे. मित्रपरिवारासह वाद घालणे टाळा. प्रिय व्यक्तीकडून आनंदाची बातमी मिळेल. आई-वडिलांकडून साथ लाभेल.

तुळ (Libra) : अतीविचार करू नका. मैत्रीचे संबंध जपावेत. जमिनीच्या कामात लाभ संभवतो. घरात तुमच्या मताला वजन प्राप्त होईल. मानसिक चंचलता जाणवेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. प्रवास काळजीपूर्वक करावा. शांतपणे विचार करण्याला प्राधान्य द्या. जास्त पैसे खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा. प्रिय व्यक्तीला वेळ द्या. कामाच्या बाबत हलगर्जीपणा करु नका. प्रेमात सावध राहा.

वृश्‍चिक (Scorpio) : व्यावसायिक वाढीचे नियोजन आखाल. कामातून अपेक्षित लाभ मिळेल. नवीन लोकांशी संपर्क वाढेल. वैवाहिक सौख्य जपावे लागेल. छुप्या शत्रूंचा त्रास संभवतो. मनाजोग्या वस्तु खरेदी कराल. भावंडांचे वागणे रूचणार नाही. उगाचच टिप्पणी करायला जाऊ नका. सामोपचाराचे धोरण ठेवा. संपूर्ण विचारांती निर्णय घ्यावा. मित्रपरिवारासह आदराने वागा. घरातील मंडळींची साथ लाभेल. विचारपूर्वक निर्णय घ्या.धनु (Sagittarius) : घरच्यांना आणि जोडीदाराला वेळ देणे, ज्येष्ठांची काळजी घेणे हिताचे. दिवस चांगला जाईल. कामात चालढकल करू नका. एकाच वेळी अनेक कामे अंगावर येऊन पडतील. वेळेचे महत्व लक्षात घ्या. क्षणिक आनंदाने हुरळून जाऊ नका. पैशाचा अपव्यय टाळावा. परिवारासंबंधित कामे पूर्ण करा. प्रकृतीकडे लक्ष द्या आणि वेळेवर आजाराचे निदान करा. जुन्या मित्रांची भेट होण्याची शक्यता आहे. प्रिय व्यक्तीशी वाद घालणे टाळा.

मकर (Capricorn) : वैवाहिक सौख्याकडे अधिक लक्ष द्यावे. कामाचा आवाका वाढू शकतो. आळस झटकून टाकावा लागेल. कमिशनमधून मिळणारा फायदा लक्षात घ्यावा. कामाच्या ठिकाणी आपली पत जपावी. कौटुंबिक सौख्य जपाल. कामातून समाधान शोधण्याचा प्रयत्न करावा. तुमच्या विचारांचा आदर राखला जाईल. घरातील ताणतणामुळे त्रास होण्याची शक्यता आहे. मित्रपरिवारासह वेळ घालवा.

कुंभ (Aquarious) : जोडीदाराचा प्रेमळ सहवास लाभेल. आपले संपर्क क्षेत्र वाढेल. चारचौघात कौतुकास पात्र व्हाल. वडीलधार्‍या व्यक्तींचा विरोध होण्याची शक्यता आहे. मानसिक ताण कमी करण्याचा प्रयत्न करावा. घरगुती वातावरणात दिवस चांगला जाईल. मनाजोगी कामे करण्यात दिवस व्यतीत कराल. बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे. आर्थिक योजनांमध्ये पैसे गुंतवा. आर्थिक गणित नव्याने मांडावे लागेल.

मीन (Pisces) : नातेवाईकांशी सलोखा जपता येईल. कामात समाधान मिळेल. कामाच्या ठिकाणी चांगले वातावरण राहील. अतीउत्साह दर्शवू नका. रेस, जुगार यातून लाभ संभवतो. मित्रांशी मतभेदाची शक्यता आहे. करमणुकीची साधने शोधाल. प्रवासात किरकोळ अडचण येऊ शकते. मुलांच्या आनंदात रमून जाल. हातातील कामात यश येईल. कचेरीची कामे निघतील. बोलतांना कोणी दुखावले जाणार नाही याची काळजी घ्यावी.

Advertisement