सध्याच्या घडीला वन डे क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडण्याची मोठी स्पर्धा युवा खेळाडूंमध्ये लागली आहे. आतापर्यंत वनडेत द्विशतक अनेकांनी झळकावली आहेत. वनडेमध्ये पहिले द्विशतक क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने यांनी झळकावले होते, त्यानंतर रोहित शर्माने तीन वेळा द्विशतक पूर्ण केले होते. पण त्याचवेळी वनडेमध्ये त्रिशतक होऊ शकते, असे कोणालाही वाटले नव्हते. पण आता वनडे क्रिकेटमध्ये पहिले त्रिशतक झळकावण्याचा मान ऑस्ट्रेलियन फलंदाजाला मिळाला आहे.
कोणत्या खेळाडूने रचले ऐतिहासिक त्रिशतक
वनडे क्रिकेटमध्ये त्रिशतक होऊ शकते, यावर बऱ्याच जणांचा अजूननही विश्वास बसत नाही. पण ही गोष्ट आता घडलेली आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे क्रिकेटमध्ये पहिले त्रिशतक झळकावले आले असून ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टेफन नेरोने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत वनडेतील पहिले त्रिशतक झळकावले आहे. नेरोने यावेळी अंध आंतरराष्ट्रीय वनडे सामन्यात 140 चेंडूंमध्ये 309 धावांची खेळी साकारली आणि वनडे क्रिकेटमध्ये पहिले त्रिशतक झळकावण्याचा मान त्याने मिळवला आहे.
यापूर्वी अंधांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानचा यष्टीरक्षक मसूद जन याने 1998 साली अंधांच्या विश्वचषकात 262 धावांची खेळी साकारली होती. हा विक्रम आता नेरोने मोडीत काढला असून नेरोने हा विक्रम मोडीत काढत असतानाच पहिला त्रिशतक झळकावण्याचा मानही पटकावला आहे.
नेरोच्या त्रिशतकाच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाच्या संघाने 40 षटकांत 2 विकेट्स गमावत 541 धावा केल्या असून हा सामना ऑस्ट्रेलियाने 269 धावांनी जिंकला आहे. या मालिकेत आतापर्यंत न्यूझीलंडला एकही विजय मिळवता आलेला नसून आतापर्यंतच्या सहा वनडे सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियानेच विजय मिळवले आहेत. या मालिकेत अजून दोन सामने शिल्लक आहेत. त्यामुळे उर्वरीत दोन सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.