SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीच्या शर्यतीत ही नावे आघाडीवर; वाचा संपूर्ण यादी

राष्ट्रपती निवडणुकीची जोरदार चुरस आता पासूनच निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे विरोधकांची दिल्लीत बुधवारी मोठी बैठक पार पडली आहे. तर सत्ताधारी भाजपच्यावतीने उमेदवाराच्या नावावर एकमत होण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची विरोधकांशी चर्चा सुरु असल्याचे दिसत आहे.

देशात राष्ट्रपती निवडणुकीसाठी नामांकन प्रक्रिया सुरु झाली आहे. बुधवारी सुरु झालेल्या प्रक्रियेच्या पहिल्या दिवशी 11 जणांनी अर्ज दाखल केले. राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल विरोधकांची बैठक असून त्यात उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.

Advertisement

बैठकीला विरोधी 18 पक्षांचे नेते कोण? – या बैठकीस माजी पंतप्रधान देवगौडा, ममता बॅनर्जी (पश्चिम बंगाल), मल्लिकार्जून खरगे (काँग्रेस), अखिलेश यादव (उत्तर प्रदेश), मेहबुबा मुफ्ती (काश्मीर), सुभाष देसाई (महाराष्ट्र), ई करीम (केरळ), जयराम रमेश (काँग्रेस), प्रफुल्ल पटेल (राष्ट्रवादी काँग्रेस), टी. आर. बालू (तामिळनाडू), यशवंत सिन्हा (बिहार), रणदीप सुरजेवाला (काँग्रेस), प्रियंका चतुर्वेदी (शिवसेना), उमर अब्दुल्ला (नॅशनल कॉन्फरन्स), राजा (तामिळनाडू) आदी १८ नेते उपस्थित होते. राष्ट्रपतीपदाचे उमेदवार ठरविण्यासाठी नवी दिल्ली येथे आज पार पडलेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीचे अध्यक्षस्थान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी भूषविले.

NDA कडून कोण उमेदवार असू शकतो ?
विरोधी पक्षासह भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनेही उमेदवारांबाबत मौन बाळगले आहे. भाजप राष्ट्रपती कोविंद यांना दुसर्‍या टर्मसाठी पुन्हा नामनिर्देशित करण्याची शक्यता नाही. त्यामुळे अन्य अनेक उमेदवारांबद्दल अटकळ बांधली जात आहे. यामुळे NDA कडून या नावाची सर्वाधिक चर्चा सुरु आहे. आरिफ मोहम्मद खान, द्रौपदी मुर्मू, अनुसुईया उईके, तमिलसाई सुंदरराजन, सुमित्रा महाजन, मुख्तार अब्बास नक्वी

Advertisement

विरोधी पक्षांकडून या नावांची चर्चा?
शरद पवारांनी नकार दिल्यानंतर जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो, असे सांगण्यात येत आहे. तर याशिवाय माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा किंवा G-23 गटाचे नेते गुलाम नबी आझाद यांचीही नावे समोर येत आहेत.

आता पर्यंत अर्ज दाखल करण्याची यादी :

Advertisement

1. डॉ. के. पद्मराजन, सीलम, तामिळनाडू
2. जीवन कुमार मित्तल, दिल्ली
3. मोहम्मद ए हामिद पटेल, मुंबई, महाराष्ट्र
4. सायरा बानो मोहम्मद पटेल, मुंबई, महाराष्ट्र
5. टी. रमेश, नमक्कल, तामिळनाडू
6. श्याम नंदन प्रसाद, मोकामा, बिहार
7. प्रा. दयाशंकर अग्रवाल, दिल्ली
8. ओम प्रकाश खरबंदा, दिल्ली
9. लालू प्रसाद यादव, बिहार
10. ए. मणिथन, तामिळनाडू
11. डॉ. मंदती तिरुपती रेड्डी, आंध्र प्रदेश

Advertisement