SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ब्रेकिंग : दहावीच्या निकालाची तारीख जाहीर, ‘असा’ पाहा ऑनलाईन निकाल..!

दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे.. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या (ता. 17) जाहीर होणार आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली. त्यानुसार, उद्या दुपारी 1 वाजता हा निकाल ऑनलाईन जाहीर होणार आहे.

गेल्या आठवड्यात बारावीचा निकाल जाहीर झाला होता. त्यानंतर विद्यार्थी-पालकांचे लक्ष दहावीचा निकालाकडे लागले होते. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी 15 जूनपर्यंत दहावीचा निकाल जाहीर केला जाणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, 15 जून उलटून गेल्यावरही निकाल जाहीर न झाल्याने विद्यार्थी चिंतेत पडले होते..

Advertisement

दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. पैकी 8 लाख 89 हजार 584 विद्यार्थी, तर 7 लाख 49 हजार 487 विद्यार्थिनींनी ही परीक्षा दिली. या विद्यार्थ्यांचे लक्ष दहावीचा निकाल कधी लागतोय, याकडे लागले होते.

Advertisement

राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी अखेर आज दहावीच्या निकालाची तारीख व वेळ जाहीर केली. त्यानुसार उद्या दुपारी 1 वाजता ऑनलाइन पद्धतीने दहावीचा निकाल जाहीर केला जाणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे..

असा पाहा निकाल

Advertisement
  • दहावीचा निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in किंवा mahahsscboard.in वर जा.
  • वेबसाइटच्या होमपेजवर ‘एसएससी निकाल-2022’ची लिंक दिसेल, त्यावर क्लिक करा.
  • त्यानंतर ‘Now’वर क्लिक केल्यानंतर जन्मतारखेसोबत तुमचा रोल नंबर किंवा नाव भरा.
  • पुढील पेजवर तुम्ही तुमचा महाराष्ट्र एसएससी निकाल 2022 पाहू शकाल.
  • प्रत्येक विषयातील तुमचे गुण तपासा.
  • निकाल डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट काढून घ्या.

दरम्यान, दहावीचा ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर गुण पडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारले जाणार आहेत. त्यासाठी सविस्तर माहिती, अटी-शर्तीबाबतची माहिती https://t.co/g7ZbJdsffV या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

 

Advertisement