SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सोन्याचा भाव घसरला, ग्राहकांची होणार चांदी, वाचा आजचे ताजे दर..

जागतिक घडामोडींमुळे काही महिन्यापासूनच अनेक आर्थिक घडामोडी घडत आहे. यामुळे भारतात शेअर बाजारासोबतच काही दिवसांपासूनच सतत चढ-उतार पाहायला मिळत आहे. सध्या देखील सोने आणि चांदीच्या भावात (Gold Silver Price Today) चढउतार दिसून येत असल्याने ग्राहकांना किरकोळ बाजारात (Retail Market) सोन्या-चांदीच्या दरात बदल झालेला दिसणार आहे.

भारतीय सराफा बाजारात (Indian Bullion Market-IBM) आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात (International Bullion Market-IBM) सोन्याच्या किंमतीत सतत बदल होताना दिसतोय. सध्या सोन्याचे दर किरकोळ खाली आले आहेत, तर चांदीचा दर देखील उतरला आहे. मागील वर्षानुसार पाहिलं तर हा सोन्याचा भाव जरा स्वस्त वाटत आहे. सोने जवजवळ पन्नास हजाराच्या आतमध्ये असल्याने सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारांना (investors) चांगली संधी आहे.

Advertisement

आजचा सोने आणि चांदीचा दर आपल्याला जाणून घ्यायचा असेल तर आज सोन्या चांदीच्या दरात काहीशी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. आज (गुरूवार) 16 जून रोजी सकाळी 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव (Gold Price Today) 47,150 रुपये आहे. तर चांदीची किंमत (Silver Price Today) 60,000 रुपये प्रति किलोपर्यंत व्यवहार करत आहे. खालील काही शहरांच्या दिलेल्या दरात आणि तुमच्या शहरानुसार दरात किंचित फरक असू शकतो, अचूक दर तुम्ही स्थानिक ज्वेलर्सशी संपर्क करून जाणून घेऊ शकता.

आजचा 10 ग्रॅम सोन्याचा दर (Gold Price) –

Advertisement

1) मुंबई:
▪️ 22 कॅरेट सोन्याचा दर – 47,150 रुपये
▪️ 24 कॅरेट सोन्याचा दर – 51,440 रुपये

2) नाशिक:
▪️ 22 कॅरेट सोन्याचा दर – 47,220 रुपये
▪️ 24 कॅरेट सोन्याचा दर – 51,440 रुपये

Advertisement

3) पुणे:
▪️ 22 कॅरेट सोन्याचा दर – 47,220 रुपये
▪️ 24 कॅरेट सोन्याचा दर – 51,510 रुपये

4) नागपूर:
▪️ 22 कॅरेट सोन्याचा दर – 47,220 रुपये
▪️ 24 कॅरेट सोन्याचा दर – 51,510 रुपये
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement