इंग्लंड दौऱ्यासाठी रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आज (ता. 16) इंग्लंडमध्ये दाखल झाला. भारतीय संघ कालच (बुधवारी) इंग्लंडच्या दिशेने रवाना झाला होता. त्यामुळे बऱ्याच दिवसांनी टीम इंडियातील रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह हे वरिष्ठ खेळाडू ब्लू जर्सीत दिसले..
दरम्यान, भारतीय संघासाठी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. इंग्लंड दौऱ्याला भारतीय संघाचा सलामीवीर केएल राहुल मुकण्याची चिन्हे आहेत. दुखापतीमुळे राहुलला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून माघारी घ्यावी लागली होती. अजूनही त्यातून तो सावरलेला नाही.
भारतीय संघ इंग्लंडमध्ये दाखल झाला असला, तरी केएल राहुल याने अजूनही बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी सोडलेली नाही. येत्या शनिवारी (ता. 18) अकादमीत त्याची तंदुरुस्ती चाचणी होणार असून, त्यानंतरच त्याच्या समावेशाबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगण्यात येते.
राहुल दौऱ्याला मुकणार
दुखापतीमुळे केएल राहुल इंग्लंड दौऱ्याला (England Tour) मुकण्याचीच शक्यता वर्तवली जात आहे. अर्थात, याबाबतची अधिकृत घोषणा अजूनही झालेली नाही. केएल राहुलला ‘ग्रोइन इन्जुरी’ झाली आहे. आधी ही दुखापत सामान्य असल्याचे म्हटलं जात होतं, पण आता तो इंग्लंड दौऱ्याला मुकण्याची शक्यता आहे. अखेरीस ती भीती खरी ठरण्याची चिन्हे आहेत..
England bound ✈️
Advertisement📸 📸: Snapshots as #TeamIndia takes off for England. 👍 👍 pic.twitter.com/Emgehz2hzm
— BCCI (@BCCI) June 16, 2022
Advertisement
सध्या रोहित, विराट, जसप्रीत यांच्यासह आर. अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर व प्रसिद्ध कृष्णा, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी व यष्टीरक्षक केएस भरत इंग्लंडमध्ये दाखल झाले आहेत. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, ऋषभ पंत हे दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी-20 मालिका संपल्यानंतर रविवारी (ता. 19) इंग्लंडमध्ये दाखल होतील.
मागील वर्षी भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. मात्र, कोरोनामुळे पाचवा कसोटी सामना स्थगित करावा लागला. ही मॅच येत्या 1 ते 5 जुलैदरम्यान एजबस्टन येथे होणार आहे. भारताने या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली होती. हा सामना जिंकून टीम इंडियाला इतिहास घडवण्याची संधी आहे. तत्पूर्वी भारतीय संघ चार दिवसीय सराव सामना खेळणार आहे.
भारतीय कसोटी संघ
रोहित शर्मा ( कर्णधार), लोकेश राहुल, (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, रिषभ पंत, के. एस. भरत, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव, प्रसिद्ध कृष्णा.
भारत-इंग्लंड मालिकेचे वेळापत्रक
- चार दिवसीय सराव सामना वि. लेइसेस्टरशायर कौंटी क्रिकेट क्लब – 24 ते 27 जून
- भारत ‘अ’ वि. डर्बिशायर टी-20 – 1 जुलै
- पाचवी कसोटी – 1 ते 5 जुलै 2022, एडबस्टन.
ट्वेंटी-20 मालिका
- पहिला सामना – 7 जुलै 2022, एजीस बॉल
- दुसरा सामना – 9 जुलै 2022, एडबस्टन
- तिसरा सामना – 10 जुलै 2022, ट्रेंट ब्रिज
वन-डे मालिका
- पहिला सामना – 12 जुलै 2022, ओव्हल
- दुसरा सामना – 14 जुलै 2022, लॉर्ड्स
- तिसरा सामना – 17 जुलै 2022, ओल्ड ट्रॅफर्ड