SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries): घरगुती वातावरण शांततेचे ठेवावे. लहान-सहान गोष्टी फार मनावर घेऊ नका. घरात तुमच्या शब्दाला महत्व दिले जाईल. कामाच्या ठिकाणी नवीन लोकांची मदत घेता येईल. काही बदल समजून घेऊन वागावे. छोट्याश्या गोष्टींनी नाराज होऊ नका. कौटुंबिक जबाबदारीची जाणीव मनात जागृत ठेवा. सर्वांशी गोडीने वागाल. आरोग्य नरम-गरम राहील. मार्गदर्शन करण्याच्या सहज भावनेतून सर्वांना मदत करा. सामान्य स्थितीत मध्यम स्वरूपाची कार्ये पूर्ण होतील.

वृषभ (Taurus): धार्मिक कामात मन गुंतवावे. बोलतांना शब्द जपून वापरावेत. कौटुंबिक खर्च नव्याने विचारात घ्यावा. जोडीदाराचा हट्ट पुरवावा लागेल. लहरीपणाने वागू नका. कोणत्याही प्रकारचा उतावीळपणा करू नका. कामाची अचूक आखणी करावी. तुमचा आजार तुमच्या दु:खाचे कारण ठरेल. लवकरात लवकर त्यावर मात करून कुटुंबात आनंद परत आणा. शत्रूवर्ग पराभूत होईल.

मिथुन (Gemini) : कामाचा आवाका लक्षात घ्यावा. वेळेचे भान ठेवावे. काही बदल अनपेक्षितरीत्या घडून येतील. प्रयत्नात कसूर करू नका. कष्टाला पर्याय नाही हे लक्षात ठेवा. तुमचे उत्पन्न चांगले राहील. लवकर यश मिळवण्यासाठी अयोग्य कृतींकडे लक्ष देऊ नका. भावनांच्या भरात वाहून नुकसान होण्याची शक्यता आहे. महत्वाच्या प्रश्नांची सोडवणूक होण्याची शक्यता आहे. जोखीम आणि तारणाची कामे टाळा.

कर्क (Cancer) : वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे. भावंडांशी मतभेद वाढवू नका. हातापायाला किरकोळ इजा संभवते. अधिकाराचा गैरवापर टाळावा. कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवावा. आरोग्याला त्रास होऊ शकतो. आर्थिक विषयांमध्ये स्थिती सहयोगात्मक राहील. आज शुभवार्ता मिळेल. प्रतिष्ठित व्यक्तीचे मार्गदर्शन मिळेल. लाभाचे नवीन मार्ग दिसतील. छोट्या प्रलोभनांपासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करा.

सिंह (Leo) : मनातील नैराश्य दूर सारावेत. क्षणिक आनंदाने हुरळून जाल. प्रवासात किरकोळ अडचण येवू शकते. कौटुंबिक प्रश्न आधी विचारात घ्या. झोपेची तक्रार जाणवेल. आपल्या पत्नीच्या सफलतेचे कौतुक करा, तिच्या यशाने आनंदी व्हा आणि उज्ज्वल भविष्याची कामना करा. कृतज्ञतेने आणि मनापासून तिच्या कामाचे कौतुक करा.संपूर्ण दिवस वातावरण होकारात्मक राहील.

कन्या (Virgo) : क्षुल्लक गोष्टींनी मुलांवर चिडचिड करू नका. खेळाची आवड जोपासता येईल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. कामाचा वेग वाढवता येईल. उत्साहाने नवीन गोष्टीत लक्ष घालाल. नोकरीच्या ठीकाणी अधिकारात वाढ होईल. तुमचे कार्यक्षेत्र विस्तारेल. आईचेे सल्ले योग्यच असतील. मतभेदांमुळे खाजगी नातेसंबंधात फूट पडण्याची शक्यता आहे. सतत कार्यमग्न राहाल.

तुळ (Libra) : हातातील कामात यश येईल. हित शत्रूंचा त्रास कमी होईल. चुगलखोर व्यक्तींपासून सावध राहावे. नातेवाईकांशी सलोखा ठेवावा लागेल. मनात गैरसमजाला थारा देऊ नका. खिशाला कात्री लागू शकते. लहान-सहान कामासाठी धावपळ होईल. झोपेची तक्रार जाणवेल. ऑनलाइन व्यवसाय करणाऱ्यांनी व्यवसाय वाढवण्यासाठी नवीन योजना आखल्या पाहिजेत. प्रवासाचे योग संभवतात.

वृश्‍चिक (Scorpio) : मनातील इच्छा पूर्ण होईल. कौटुंबिक खर्चाचा ताळमेळ घालावा. बढतीसाठी प्रयत्न करावेत. मित्रांशी मतभेद संभवतात. तुमच्या शब्दाला वजन प्राप्त होईल. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराने केलेल्या प्रेमाच्या वर्षावामुळे आयुष्यातील सगळे कष्ट विसरून जाल. मानसिक ताण जाणवू शकतो. योग्य संधीची वाट पहावी लागेल. मनातील इच्छा पूर्ण होईल. काहीसे हट्टीपणाने वागाल.

धनु (Sagittarius) : मनातील जुनी आकांक्षा पूर्ण होईल. स्त्रियांची मदत मोलाची ठरेल. नवीन ओळखी दृढ होतील. मनाजोगी खरेदी करता येईल. जोडीदाराशी वाद संभवतात. नवीन लोक संपर्कात येतील. प्रॉपर्टी डीलरसाठी आजचा दिवस अधिक फायदेशीर आहे. जास्त खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. अनावश्यक खर्चात कपात करा. कामाच्या ठिकाणी तुमच्या अनुकूल बदल होऊ शकतात. काळजीपूर्वक कार्य करा. आर्थिक विषयांमध्ये देवाण-घेवाण टाळा.

मकर (Capricorn) : आपल्याच हट्टावर ठाम राहाल. दुचाकी वाहन चालवताना सावधानता बाळगावी. नसते साहस करू नका. संयम सोडून चालणार नाही. सारासार विचारावर भर द्यावा. आज नोकरीच्या बाबतीत तणावाखाली राहतील. व्यवसायात प्रगती होईल. वडिलांच्या चरणस्पर्श करून आशीर्वाद घ्या. कोणत्याही मोठ्या कार्यक्रमात मित्रांचे सहकार्य मिळेल. कामात अडचणी येण्याची शक्यता आहे.

कुंभ (Aquarious) : कर्तव्यापेक्षा इच्छेला महत्व द्याल. मनातील अरसिकता काढून टाकावी. जोडीदाराच्या शांत स्वभावाने अचंबित व्हाल. मानसिक ताण ध्यानधारणा करून दूर करण्याचा प्रयत्न करावा. फार हट्टीपणा करू नका. यावेळी व्यापाऱ्यांनी अत्यंत सावधगिरीने काम करणे आवश्यक आहे. आर्थिक बाबी तुमच्या बाजूने सुटू शकतात. उत्तम मानवी मूल्ये जोपासा. चाकरमान्याची परिस्थिती अनुकूल असेल.

मीन (Pisces) : सामुदायिक गोष्टीत फार लक्ष घालू नका. कामे उगाचच अडकून पडल्यासारखी वाटू शकतात. गैरसमजुतीतून वाद वाढू देऊ नका. कर्ज प्रकरणे तूर्तास टाळावीत. प्रवासात काळजी घ्यावी. खाण्यापिण्याच्या व्यापाऱ्यांना चांगला काळ आहे. विद्यार्थ्यांना तज्ञ शिक्षकांची मदत मिळेल. एखाद्यावर जास्त विश्वास ठेवणे तणावपूर्ण असू शकते. महत्वाच्या बातम्या मिळण्यामुळे परिस्थिती सुखद राहील.

Advertisement