SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

खुशखबर..!! सोनं खरेदी करण्याची योग्य वेळ आली

आपण सोनं खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर ही चांगली संधी आपल्यासाठी आहे. कारण, सोन्याच्या दरात मोठी घट झाल्याचे पहिला मिळाले आहे. गेल्या आठवड्यात सोने-चांदीच्या दर कमी जास्त होत असले तरी मात्र या आठवड्याच्या सुरवातीपासून सोन्याचे भाव हे स्थिर होते. मात्र आज सोन्याच्या दरात पुन्हा घसरण दिसून आली आहे तर या तुलनेत आज चांदीचे दर मात्र वाढले आहे.

गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार आज 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 47,390 रुपये तर 24 कॅरेट साठी 51,700 रुपये आहे तर आज 10 ग्रॅम चांदीच्या दर 600 रूपये आहे.

Advertisement

देशातील काही प्रमुख शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव :

▪️ चेन्नई – 51,870 रुपये
▪️ दिल्ली – 51,700 रुपये
▪️ हैदराबाद – 51,700 रुपये
▪️ कोलकत्ता – 51,700 रुपये
▪️ लखनऊ – 51,890 रुपये
▪️ मुंबई -51,700 रुपये
▪️ नागपूर – 51,770 रुपये
▪️ पूणे – 51,770 रुपये

Advertisement

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध असून त्या तुलनेत 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. तर 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. तर 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

Advertisement