SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, पंतला विश्रांती, ‘हा’ खेळाडू असणार कॅप्टन..!

भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी महत्वाची बातमी आहे.. सध्या भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळत आहे.. या मालिकेतील अखेरचा सामना 19 जून रोजी होणार आहे, त्यानंतर लगेच भारतीय संघ 26 जूनपासून आयर्लंड विरुद्ध 2 टी-20 मॅच खेळणार आहे. या मालिकेसाठी बुधवारी (ता.15) टीम इंडियाची (team India) घोषणा करण्यात आली..

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केएल राहुल याच्याकडे नेतृत्व देण्यात आले होते. मात्र, त्याला दुखापत झाल्यानंतर विकेटकिपर ऋषभ पंत याच्यावर ही जबाबदारी देण्यात आली.. तर ऑलराऊंडर खेळाडू हार्दिक पांड्या याला उपकर्णधार केले होते.

Advertisement

आयर्लंडच्या दौऱ्यावरही (Ireland tour) टीम इंडियातील वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.. सध्याचा हंगामी कॅप्टन पंत यालाही आयर्लंड दौऱ्यातून विश्रांती देण्यात आली असून, त्याच्या जागी आता हार्दिक पांड्या हा टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे. ‘आयपीएल’मध्ये आपल्या कुशल नेतृत्व करताना पांड्याने आपल्या ‘गुजरात टायटन्स’ संघाला विजेतेपद मिळवून दिले होते..

Advertisement

येत्या 26 जूनपासून आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया 2 टी-20 सामने खेळणार असून, त्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. हार्दिक पांड्या कॅप्टन, तर दिग्गज बाॅलर भुवनेश्वर कुमार याला उपकर्णधार करण्यात आले आहे..

याशिवाय सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन याचंही संघात पुनरागमन झालंय.. पंतच्या जागी विकेट किपर म्हणून दिनेश कार्तिक याची निवड झालीय..

Advertisement

आयर्लंडविरुद्ध भारतीय संघ

हार्दिक पांड्या (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, वेंकटेश अय्यर, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंह, उमरान मलिक.

Advertisement

सामन्यांचे वेळापत्रक

सामना दिनांक  ठिकाण
पहिला टी20 सामना 26 जून डबलिन क्रिकेट स्टेडियम, मलाहाइड, आयर्लंड
दुसरा टी20 सामना 28 जून डबलिन क्रिकेट स्टेडियम, मलाहाइड, आयर्लंड

 

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement