SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आता इंटरनेटशिवायही पाहता येणार चित्रपट आणि OTT कंटेंट; ‘या’ टेक्नॉलॉजीमुळे होणार क्रांती

मुंबई :

अलीकडच्या काळात शिक्षणापासून तर कामापर्यंत बऱ्याच गोष्टी ऑनलाईन झाल्या आहेत. मनोरंजनालाही आता ऑनलाईन शिवाय फार कमी पर्याय उरले आहेत. आता क्रिकेटच्या मॅचेस, रिअ‍ॅलिटी शोज, सीरियल्सचे एपिसोड किंवा अगदी चित्रपट अशा सर्व गोष्टी आपण स्मार्टफोनच्या माध्यमातून ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT) केव्हाही आणि कुठेही पाहू शकतो. यासाठी आपल्याला आपला बराचसा इंटरनेटचा डेटा खर्च करावा लागतो. मात्र आता कोणताही डेटा खर्च केल्याशिवाय आपल्याला क्रिकेटच्या मॅचेस, रिअ‍ॅलिटी शोज, सीरियल्सचे एपिसोड किंवा अगदी चित्रपट पाहता येऊ शकणार आहे.

Advertisement

यासाठी लवकरच D2M अर्थात डायरेक्ट टू मोबाइल ब्रॉडकास्टिंग टेक्नोलॉजीचा वापर करण्यात येणार आहे. डीटूएम ब्रॉडकास्टिंग टेक्नॉलॉजी म्हणजे तंत्रज्ञानाच्या मदतीनं तुमच्या मोबाइलवर थेट मल्टिमीडिया कंटेंट प्रसारित होईल. जसं काही वर्षांपूर्वी किंवा अजूनही एफएम (FM) ऐकण्यासाठी आपल्याला कोणत्याही वायर्ड कनेक्शनची गरज भासत नाही, अगदी त्याचप्रमाणे हा कंटेंट तुमच्या मोबाइलवर दिसू शकेल.

दिल्लीमध्ये झालेल्या डायरेक्ट-टू-मोबाइल आणि 5G ब्रॉडबँड कन्व्हर्जन्स रोड मॅप फॉर इंडिया कार्यक्रमात यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्रा यांनी या कार्यक्रमात म्हटलं आहे की, डायरेक्ट- टू-मोबाइल आणि 5G ब्रॉडबॅंडमुळे देशातल्या ब्रॉडबॅंड आणि स्पेक्ट्रमच्या वापरात सुधारणा होईल.

Advertisement

सध्या आपण पाहिलं असेल की कधी कधी इंटरनेट कनेक्शन स्लो झाल्यानंतर ऑनलाईन कन्टेन्ट आपल्याला दिसत नाही किंवा बफर होतो. नव्या ब्रॉडकास्ट तंत्रज्ञानामुळे या सर्व समस्या दूर होणार आहेत. तसंच या तंत्रज्ञानामुळे युझर्सपर्यंत पोहोचणारी फेक अर्थात खोटी माहिती रोखणं शक्य होणार आहे.

Advertisement