SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

लहान मुलांसाठी आली भन्नाट बाईक, पालकांना ठेवता येईल वेगावर नियत्रंण..!

सध्याच्या तरुणाईला बाईकचं प्रचंड वेड असल्याचं दिसतं.. ते पाहून अगदी चिमुकलेही आता बाईकच्या प्रेमात पडले आहेत. सध्या इलेक्ट्रिक वाहनांना मोठी असताना, अनेक कंपन्या या चिमुकल्यांसाठी छोट्या रुपात इलेक्ट्रिक बाईक तयार करीत आहेत. त्यामुळे लहान मुलेही इलेक्ट्रिक बाईक्स-स्कूटरवर रपेट मारताना दिसतात..

भारतातील अनेक कंपन्या 8 ते 10 वर्षांच्या मुलांसाठी इलेक्ट्रिक बाईक-स्कूटरची निर्मिती करीत आहेत. त्यात आता देशातील आघाडीची दुचाकी कंपनी ‘कावासाकी’चाही समावेश झाला आहे. या कंपनीने नुकतीच 3 ते 8 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी त्यांची पहिली इलेक्ट्रिक दुचाकी इलेक्ट्रोड सादर केली. ‘कावासाकी इलेक्ट्रोड’ची (kawasaki electrode bike) किंमत, रेंज आणि टॉप स्पीडबाबत संपूर्ण माहिती जाणून घेऊ या..

Advertisement

बाईकची वैशिष्ट्ये
– ‘कावासाकी इलेक्ट्रोड बाईक’ 45 किलोपर्यंत वजन उचलू शकते. या बाईकची फ्रेम ॲल्युमिनियमपासून बनवली असून, त्यात 16 इंच कास्ट ॲल्युमिनियमची चाके आहेत. लहान मुलांसाठी कंपनीने ‘हँडल बार’ आणि ‘सीट ॲडजस्टेबल’चाही पर्याय दिला आहे..
– ‘कावासाकी बाईक’ची बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी अडीच तास लागतात. या बाईकमध्ये ’36 व्ही 5.1 एएच’ लिथियम-आयन बॅटरी दिली आहे. फास्ट-चार्जिंगबाबत कंपनीकडून सविस्तर माहिती समोर आलेली नाही.
– एका चार्जिंगवर ही बाईक 150 मिनिटे धावू शकते.. तसेच, या बाईकचे वजन 14.5 किलो असल्याचे सांगण्यात येते.

वेगावर पालकांचे नियंत्रण
‘कावासाकी’च्या या बाईकमध्ये तीन ‘रायडिंग मोड’ आहेत. त्यात कमी, मध्यम व उच्च कॅपिंग टॉप स्पीडचा समावेश आहे. या तिन्ही मोडमध्ये अनुक्रमे 8 केपीएच, 12 केपीएच आणि 20 केपीएच स्पीड मिळेल. शिवाय, ‘रायडर मोड’मध्ये टॉगल करण्यासाठी पासकोड टाकावा लागेल. त्यामुळे पालक या बाईकचा वेग ठरवू शकतील.

Advertisement

किंमत – ‘कावासाकी’च्या या बाईकची किंमत सुमारे 85 हजार रुपयांच्या आसपास आहे.. सध्या ही बाईक अमेरिकेत लाॅंच करण्यात आली असून, लवकरच ती भारतात येणार असल्याचे सांगण्यात येते..

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement