आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या बहुचर्चित ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकतीच काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला होता. या टीझरमध्ये सर्व पात्रांचा लूक दाखवण्यात आला असून टीझर पाहिल्यानंतर चाहत्यांची चित्रपटाबाबतची उत्सूकता आणखी शिगेला पोहचली आहे.
मात्र नुकताच या चित्रपटचा ट्रेलर देखील रिलीज झाला असून ट्रेलरमध्ये रणबीर आणि आलिया यांच्यासोबतच अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय हे देखील या ट्रेलरमध्ये दिसत आहेत. आलियानं या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘आमच्या ह्रदयाचा भाग- ब्रम्हास्त्र. 09.09.2022 रोजी लवकरच भेटूयात. ‘ असेही लिहले आहे.
ट्रेलर पाहण्यासाठी :
AdvertisementView this post on Instagram
Advertisement
k
ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या ट्रेलर काय?
ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये असे दिसत आहे की, या चित्रपटाचे कथानक हे शिवा या भूमिकेवर आधारित असून शिवा ही भूमिका रणबीरनं साकारली आहे. शिवा आणि ईशा यांची लव्हस्टोरी देखील या चित्रपटामध्ये दाखण्यात येणार आहे. तर ईशा ही भूमिका आलिया भट्ट साकारत आहे. तर ब्रम्हास्त्र चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन हे प्रोफेसर ‘अरविंद चतुर्वेदी’ आहेत आणि नागार्जुन पुरातत्वशास्त्रज्ञ च्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांचे नाव ‘अजय वशिष्ठ’ आहे. मौनीच्या पात्राचे नाव ‘दमयंती’ आहे. तर ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या पहिल्या पार्टचा हा ट्रेलर असून या चित्रपटाचे तीन पार्ट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. अयान मुखर्जीनं या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे.