SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

धोनी सध्या काय करतो.? पत्नीच्या ‘या’ व्हिडीओतून झाला उलगडा…!

‘आयपीएल’चा 15 वा हंगाम संपल्यापासून ‘कॅप्टन कुल’ माही अर्थात महेंद्रसिंह धोनीचे नाव कुठेच दिसत नाही. सोशल मीडियावरही धोनी फारसा दिसत नाही. त्यामुळे धोनी नेमकं करतोय काय, असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला होता. मात्र, त्याची पत्नी साक्षी धोनी सोशल मीडियावर चांगली अॅक्टिव्ह आहे. त्यामुळे धोनीबाबतचे अपडेट्सही मिळतात..

धोनीचे प्राणीप्रेम लपून राहिलेलं नाही.. त्याच्याकडे कुत्रे, घोडे असून, कोंबड्यांच्या व्यवसायातही त्याचे नाव समोर आले होते.. फक्त प्राणीच नव्हे, तर त्याला पक्षीही खूप आवडतात. त्याच्याकडे एक पोपटही आहे. त्यानंतर धोनीच्या घरी आणखी नव्या पाहुण्यांचे आगमन झालेय.. त्याने आता बकऱ्या पाळण्यास सुरुवात केल्याचे समजते…

Advertisement

 

View this post on Instagram

 

Advertisement

A post shared by Sakshi Singh (@sakshisingh_r)

Advertisement

धोनी पाळतोय बकऱ्या

महेंद्रसिंग धोनीची बायको साक्षी धोनी हिने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. साक्षीच्या इन्स्टाग्राम रील्समध्ये त्यांच्या फार्महाऊसच्या गार्डनमध्ये दोन पांढऱ्या शुभ्र बकऱ्या आरामात लाॅनमध्ये चरताना दिसतात. या रिल्समुळे धोनी सध्या पाळीव प्राण्यांमध्ये रमल्याचे पाहायला मिळत आहे..

Advertisement

धोनीने वर्षभरापूर्वीच या बकऱ्या गुजरातमधून आणले होते.. सुरुवातीला त्याने बकऱ्यांना फार्महाऊसमध्ये ठेवले नव्हते. मात्र, आता धोनीने त्या फार्महाऊसवर आणल्या आहेत. साक्षीच्या या व्हिडीओवर नेटकरी अनेक काॅमेंट्स करीत आहेत. काहींनी तर धोनीलाच ‘G O A T’ असं म्हटलंय..

क्रीडा जगतात ‘G O A T’ शब्दाचा अनेकदा वापर केला जातो. या शब्दाचा अर्थ आहे, ‘Greatest off All Time’… त्यामुळेच धोनीला ‘G O A T’ म्हटलं जात आहे. चाहत्यांनाही धोनीचा हा उपक्रम चांगलाच आवडल्याचे दिसते..

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement