केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी व देशातील नागरिकांसाठी अनेक योजना आणत असते. केंद्र सरकार या योजना राबवत असताना काही योजनेद्वारे आर्थिक लाभ, अनुदान असा लाभ देत असते. भारत हा शेतीप्रधान देश आहे आणि उद्योगधंद्यासोबतच शेतीमुळे देखील भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लागत असतो.
शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने पीएम किसान सन्मान निधी नावाची योजना सुरू केलेली आहे आणि या योजनेचा 11 वा हप्ता जारी केला आहे. तुम्ही योजनेचे लाभार्थी असाल तर या योजनेंतर्गत तुम्हाला (शेतकऱ्यांना) वार्षिक 6 हजार रुपये सरकारकडून अनुदान म्हणून दिले जातात.
PM KISAN योजनेच्या माध्यमातून सहा हजार रुपये 4 महिन्यांच्या अंतराने प्रत्येकी 2000 रुपयांच्या 3 हप्त्यात दिले जातात. पण अनेकांना माहीत नसतं की, या योजनेचे सध्या किती हप्ते आले, आपले नाव योजनेत आहे का, किती पैसे आले ? या माहीतीसाठी केंद्र सरकारने यापुर्वी एक ॲप देखील लॉंच केलं आहे. ज्यानंतर तुम्हाला बँकेत जाण्याची गरज लागणार नाही.
देशातील केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी 2 वर्षांपूर्वी एक उत्तम ॲप PM Kisan GoI (PMKISAN GoI) लाँच केले होते, ज्यामुळे शेतकरी त्यांच्या हप्त्याची रक्कम आणि योजनेशी संपूर्ण माहिती घेऊ शकतात. PM Kisan GoI ॲपच्या मदतीने पीएम किसान सन्मान निधीचे लाभार्थी त्यांच्या खात्याशी संबंधित बरीच माहिती मिळवू शकणार आहे. या ॲपची अजूनही या या अनेकांना माहीती नाहीये.
अँड्रॉईड मोबाईल आजकाल सर्वत्र झालाय. PMKISAN GoI App असं सर्च केलं की, तुम्ही Google Play Store वरून ते डाऊनलोड करू शकता. आतापर्यंत 50 लाखांहून अधिक लोकांनी हे ॲप्लिकेशन डाउनलोड केले आहे. हे ॲप हिंदी आणि इंग्रजीसह इतर भाषांमध्ये उपलब्ध झालं आहे. लाभार्थी शेतकऱ्यांनो, जर तुमच आधार कार्ड (Aadhaar Card), बँक खाते क्रमांक आणि मोबाईल क्रमांक लिंक असेल, तर PMKISAN GoI ॲपद्वारे तुम्ही PM किसान योजनेची बरीच माहिती मिळवू शकता.
ॲप उघडल्यावर काय करायचं?
▪️ Google Play Store वरून PM Kisan GOI मोबाइल ॲप डाउनलोड केल्यानंतर, ॲप उघडा आणि ‘नवीन शेतकरी नोंदणी’ यावर क्लिक करा.
▪️ मग आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड टाका. शेतकरी नोंदणी फॉर्ममध्ये तुमचं नाव, बँक खात्याचा तपशील आणि तुमचा पत्ता अशी डिटेल्स भरा. मग जमिनीची माहिती द्यावी लागेल.
▪️ आता सबमिट बटनावर क्लिक करा आणि लगेच तुम्ही हे ॲप वापरू शकाल आणि वाटेल तेव्हा फक्त ॲप उघडलं की लगेच माहीती पाहता येईल.