SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

पंतप्रधानाच्या हस्ते लोकार्पण होणारं संत तुकाराम महाराजांचं शिळा मंदिर नेमकं आहे तरी कसे? जाणून घ्या या मंदिराचे महत्व

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज (14 जून) रोजी देहूत येणार असून पंतप्रधानांच्या हस्ते श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा आज पार पडणार आहे. मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर देहूत पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पंतप्रधानांच्या हस्ते होणार असला तरी मात्र, हे शिळा मंदिर नेमके कसे आहे? याची उत्सुकता अनेकांना लागली आहे. तर जाणून घेऊयात या शिळा मंदिराबद्दलची माहिती अत्यंत थोडक्यात…

शिळा मंदिरचा इतिहास :

Advertisement

संत तुकारामांचा अभंगाचा गाथा इंद्रायणी नदीत बुडाल्यानंतर तुकाराम महाराज ज्या शिलेवर 13 दिवस अन्न पाण्याशिवाय बसून होते व गाथा 13 दिवसांनंतर चमत्कार व्हावा तशा पाण्यातून वर आल्या अशी आख्यायिका आहे. आनंदडोहाजवळून ही शिला किंवा दगड या ठिकाणी आणण्यात आला. ही शिला अत्यंत पवित्र असून वारकरी संप्रदायासाठी भक्तिभावाचे स्थान असल्याचे सांगण्यात येते.

देहू संस्थानच्या वास्तूत तुकाराम महाराजांची प्रतिमा असून 2008 मध्ये या मंदिरातील चांदीचा मुखवटा चोरीला गेला होता, जो काही दिवसांनी इंद्रायणी नदीच्या तीरावर मिळाला. त्यावेळी या ठिकाणी मंदिर बांधण्याचे व ही जागा अधिक सुरक्षित करण्याचे देहू संस्थानने ठरवले आहे. याच मंदिराचे उद्घाटन आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात येणार आहे.

Advertisement

शिळा मंदिर कसं आहे?

मंदिरात स्थापित केलेल्या दगडाचे तुळशी वृंदावन आहे. पूर्वीच्या मंदिरात तुकाराम महाराजांची मूर्ती आणि मंदिरावर कळस नव्हता. त्या शिळा मंदिरात अखंड काळ्या पाषाणाची 42 इंच सुबक मूर्ती असून मंदिरावर 36 कळस स्थापन करण्यात आले आहेत. तर संत तुकाराम महाराजांचं आयुष्यमान 42 वर्षाचं असल्यानं शिळा मंदिराची कळसापर्यंतची उंची 42 फुटांची आहे. शिळा मंदिरातील संत तुकोबांच्या मूर्तीची उंची 42 इंच आहे. संत तुकोबांची काळ्या पाषाणातील ही मूर्ती 42 दिवसांमध्ये उभारली आहे. ही मूर्ती शिल्पकार चेतन हिंगे यांनी तयार केली असल्याचे सांगण्यात येते आहे.

Advertisement

कशी आहे मंदिराची रचना :
मंदिराची रचना ही हेमाडपंथी असून मूळ गर्भगृह 14×14 एवढ्या आकाराचे आहे. तर अंतर गर्भगृह 9×9 उंची 17×12 एवढी आहे. मंदिरासाठी एकूण खर्च हा 1 कोटी 17 लाख 47 हजार 500 रुपये आला आहे.

Advertisement