SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

शेतकऱ्यांनो पेरणीची घाई नको; मान्सूनचा वेग पुन्हा मंदावला

अर्धा जून संपला, पण अद्यापही मान्सून काही हवा तसा महाराष्ट्रात स्थिरावलेला नसल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये रोजच्या रोज वातावरण ढगाळ होत आहे, सोसाट्याचा वाराही सुटत आहे, पावसासाठी पूरक वातावरणही तयार होत आहे. मात्र, पावसाच्या सरी काही बरसताना दिसत नाहीत. म्हणजे थोडक्यात काय, तर यंदाचा मान्सून लांबला जरी नसला, तरीही त्याचा वेग मात्र मंदावल्याचं आता स्पष्ट होत आहे.

यंदाच्या खरीप हंगामात 6 लाख हेक्टरपेक्षा अधिक जमिनीवर विविध पिकांची लागवड होणार असल्याचे सांगण्यात येते होते. त्यासाठी लागणारे बियाणे व खतसाठाही जिल्ह्यात मुबलक प्रमाणात उपलब्ध झाला आहे. मात्र, आता हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार कोकण, मध्य महाराष्ट्र ओलांडून मान्सून मराठवाड्यापर्यंत पोहोचला आहे. पण, पावसाचं प्रमाण मात्र कमी असल्याचं सांगण्यात हवामान विभागाकडून स्प्ष्ट करण्यात आले आहे.

Advertisement

येत्या पाच दिवसांमध्ये मान्सूनची दमदार नसला तर देखील पावसाची तुरळक प्रमाणातील हजेरी हि अपेक्षित आहे. तर एकिकडे पावसानं तग धरलेला नसला तरीदेखील वरुणराजा स्थिरावल्याशिवाय पेरणीची घाई करू नका, असा मोलाचा सल्ला हवामान विभागाकडून शेतकऱ्यांना देण्यात येत आहे.

दरम्यान, अद्यापही मान्सूनची पकड पक्की नसल्याचं लक्षात येत असून तेव्हा आता मान्सूनच्या वाटेवरचे सर्व अडथळे दूर होऊन तो केव्हा बरसतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Advertisement