SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

येत्या दोन दिवसांत मुसळधार पाऊस होणार? वाचा हवामान विभागाचा अंदाज..

राज्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण तर कुठे ऊन तर कुठे थंड वातावरण असं झालं आहे. काही ठिकाणी जोरदार पाऊस सुद्धा चालू आहे. अरबी समुद्रात दाखल झाल्यानंतर नैर्ऋत्य मोसमी वारे शांत झाल्याने राज्यात साधारणतः 2 ते 3 दिवस पुन्हा उष्णतेची लाट आल्याचं जाणवलं होतं. काल मुंबई आणि परिसरात चांगलाच पाऊस झाला तर पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.

केरळ मध्ये जोरदार मान्सून चे आगमन झाल्यानंतर त्याने महाराष्ट्राकडे जराशी पाठ फिरवल्याचं मागील काही दिवसांत दिसलं. मागील काही दिवसांत अवकाळी पावसाने शेतीचं नुकसान आता या वाऱ्याने पुन्हा वेग धरला आहे. यामुळे गोवा, कोकणच्या (konkan) काही भागात मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Advertisement

सध्याचा आठवडा हा मॉन्सूनच्या वाटचालीस पोषक असल्याने गुरूवारपर्यंत मॉन्सून मध्य अरबी समुद्र, कर्नाटक, तामिळनाडूचा आणखी काही भागासह कोकण, गोव्यात मान्सून बरसेल असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा यंदा च्या वर्षी सरासरी 103 टक्के पडणार आहे, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

हवामान खात्याचे के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करत दिली माहिती..

Advertisement

महाराष्ट्राचं बोलायचं झालं, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पश्‍चिम विदर्भातसुद्धा पावसाचे प्रमाण जास्त राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात ग्रीन अ‍ॅलर्ट देण्यात आला आहे. यांपैकी परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट होण्याची शक्यताही वर्तवली आहे. राज्यात येत्या पाच 5 दिवसासाठी मुसळधार पाऊस किंवा काही ठिकाणी अतीमुसळधार पाऊसही होऊ शकतो, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

महाराष्ट्रातील कोकण या भागात सर्वात जास्त पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अद्यापही विदर्भ, मराठवाडा, सोलापूर या भागात मान्सूनला सुरुवात झाली नाही. दरम्यान पुढच्या दोन दिवसांत मान्सूनला या भागातही सुरुवात होईल अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. तसेच, पुढील पाच दिवसांमध्ये दक्षिण कोकणामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता आहे. तर राज्याच्या इतर भागात काही ठिकाणी ढगाळ वातावरण असेल तर काही ठिकाणी वादळी वारे, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement