SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

व्यावसायिकांना ISO प्रमाणपत्राची गरज का भासते? ; ISO प्रमाणपत्राचे फायदे कोणते ?

आपण अनेकदा सोन्याच्या दागिन्यांची जाहीर बघितली असेल. यामध्ये सांगतात की ISO मार्क असलेलं शुद्ध सोनंच खरेदी करा. बऱ्याच जणांना ISO म्हणजे नेमकं काय असतं ? हे माहीतच नाही. व्यापार आणि सेवा क्षेत्रात ISO प्रमाणपत्राला कमालीचं महत्व आहे. ISO म्हणजे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टँडर्डायझेशन. या संस्थेची स्थापना 23 फेब्रुवारी 1947 रोजी झाली. ISO चे मुख्यालय स्विझर्लंड स्थित जिनिव्हा येथे आहे. ISO हे गुणवत्ता मानक प्रमाणपत्र आहे. हे प्रमाणपत्र कंपनी, संस्था, व्यवसाय आणि उद्योग यांना दिले जाते.

जगभरातील 155 हून अधिक देश हे ISOचे सभासद आहेत. ISO एक स्वतंत्र संस्था आहे जी व्यवसायाची उत्पादने आणि सेवांची गुणवत्ता, सुरक्षितता आणि कार्यक्षमतेसाठी मानके प्रदान करते. सध्या व्यापार असो किंवा सेवा, सगळ्याच गोष्टींमध्ये मोठी स्पर्धा निर्माण झालेली आहे. त्यामुळे व्यवसायाची विश्वासार्हता आणि एकूण कार्यक्षमता सुधारणे अत्यंत गरजेचे झाले आहे. याच गोष्टींमध्ये ISO प्रमाणपत्र एक महत्वाची भूमिका बजावते आणि त्यामुळे ISO प्रमाणपत्राला कमालीचं महत्व प्राप्त झालं आहे. ग्राहकाला समाधान मिळणे, सरकारी कंत्राटांच्या बोली लावणे, व्यवसाय कार्यक्षमता वाढवणे, उत्पादन गुणवत्ता वाढवणे, विक्रीयोग्यता वाढणे यांसारखे फायदे आपल्याला ISO प्रमाणपत्रामुळे मिळतात.

Advertisement

ISO प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ISO मानक आणि ISO प्रमाणन संस्था निवडून उद्योजक विहित फॉर्ममध्ये एक अर्ज द्यावा लागतो. या अर्जामध्ये उद्योजक आणि प्रमाणन संस्थांचे अधिकार आणि दायित्वे आणि जबाबदारीचे मुद्दे, गोपनीयता आणि प्रवेश अधिकार यांचा समावेश असतो. अर्ज केल्यानंतर संस्थेकडून सर्व गोष्टी तपासल्या जातात आणि तुम्हाला ISO प्रमाणपत्र आणि त्याचा एक विशिष्ट नंबर दिला जातो.

Advertisement