SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries): कामानिमित्त प्रवास करावा लागेल. सतत कार्यमग्न राहाल. खिशाला कात्री लागू शकते. लहान-सहान कामासाठी धावपळ होईल. झोपेची तक्रार जाणवेल. व्यवहार पूर्ण होईल आणि फायदा होईल. रोजगाराची नवी संधी मिळेल. मित्रांसोबत चांगला वेळ जाईल. घरातील वयोवृद्धांचा मान राखा. थोडा अश्यकतपणा वाटेल पण आराम केल्यास उत्साहित वाटेल. प्रिय व्यक्तीकडून आनंदाची बातमी मिळेल.

वृषभ (Taurus): सामुदायिक वादापासून दूर राहावे. मुलांच्या गोष्टी विरोधी वाटू शकतात. मानसिक चंचलता जाणवेल. वरिष्ठांकडून कामाचे कौतुक केले जाईल. अनाठायी खर्च टाळावा. नोकरीच्या नव्या संधी चालून येतील. घाई करू नका. ज्येष्ठांचे मार्गदर्शन होईल. आज तुम्हाला डोक शांत ठेवून विचारपूर्वक कृती करणे आवश्यक आहे. आर्थिक व्यवसायात पैशांचे व्यवहार जपून करा.

मिथुन (Gemini) : तुमच्यातील प्रतिभा जागृत ठेवा. मुलांबाबत शंका मिटतील. नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करावा. उत्तम वाहन सौख्य लाभेल. गुरुकृपेचा लाभ घेता येईल. नोकरीच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळेल. कुठलीतरी चिंता जाणवेल. जुन्या मित्रांची भेट होईल. परिवारासंबंधित कामे पूर्ण करा. प्रकृतीकडे लक्ष द्या आणि वेळेवर आजाराचे निदान करा.

कर्क (Cancer) : उष्णतेचा त्रास जाणवेल. जोडीदाराशी जुळवून घ्यावे लागेल. मनातील योजना पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. आजचे काम उद्यावर ढकलू नका. जबाबदारी निभावून नेता येईल. व्यवसायासाठी प्रवास करावा लागेल. आर्थिक प्रगतीसाठी नवे द्वार खुलतील. घरात प्रसन्न वातावरण राहील. आजचा दिवस तुम्हाला आनंदात घालवता येणार आहे. मित्रपरिवारासह वाद घालणे टाळा.

सिंह (Leo) : प्रवासातील क्षुल्लक अडचणी टाळाव्यात. पाय खेचणार्‍या लोकांकडे लक्ष ठेवावे. अपचनाचा त्रास जाणवेल. कामातील तांत्रिक बाजू लक्षात घ्याव्यात. प्रलोभनाला भुलू नका. शेअर मार्केट आणि गुंतवणुकीसाठी चांगला दिवस नाही. काही कारणास्त प्रवास करावा लागेल. जुन्या मित्रांची भेट होण्याची शक्यता आहे. प्रिय व्यक्तीशी वाद घालणे टाळा. ताणतणाव कमी करण्यासाठी स्वत:ला वेळ द्या.

कन्या (Virgo) : मानसिक ताण जाणवू शकतो. योग्य संधीची वाट पहावी लागेल. मनातील इच्छा पूर्ण होईल. काहीसे हट्टीपणाने वागाल. नवीन लोक संपर्कात येतील. धोका पत्करू नका, रागावर नियंत्रण ठेवा. कामाच्या ठिकाणी प्रतिष्ठा वाढेल. उत्पन्न स्थिर राहील. जास्त पैसे खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा. प्रिय व्यक्तीला वेळ द्या. कामाच्या बाबत हलगर्जीपणा करु नका. विचारपूर्वक निर्णय घ्या.

तुळ (Libra) : आरोग्याकडे लक्ष ठेवावे. नवीन गुंतवणुकीला वाव मिळेल. अनाठायी खर्च वाढू शकतो. वरिष्ठांशी जुळवून घ्यावे लागेल. रेस जुगारा पासून दूर राहावे. दुरून चांगली बातमी मिळेल. गुंतवणुकीसाठी उत्तम दिवस. कोर्ट कचेरीचे काम पूर्ण होईल. विचारपूर्वक वागा. घरातील ताणतणामुळे त्रास होण्याची शक्यता आहे. मित्रपरिवारासह वेळ घालवा. घरातील मंडळींची साथ लाभेल.

वृश्‍चिक (Scorpio) : छोट्याश्या गोष्टींनी नाराज होऊ नका. कौटुंबिक जबाबदारीची जाणीव मनात जागृत ठेवा. सर्वांशी गोडीने वागाल. कोणत्याही प्रकारचा उतावीळपणा करू नका. कामाची अचूक आखणी करावी. अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. व्यवहार करताना घाई करू नका. जोडीदाराचे प्रेम लाभेल. आर्थिक योजनांमध्ये पैसे गुंतवा. मित्रपरिवारासह आदराने वागा. आज प्रेमप्रकरणी चुका होणार नाही याची दक्षता घ्या.

धनु (Sagittarius) : कामानिमित्तचा प्रवास सावधानतेने करावा. जोडीदाराशी मतभेद संभवतात. रागावर नियंत्रण ठेवावे. भागीदारीच्या व्यवसायात सबुरी बाळगावी. तिखट व तामसी पदार्थ खाल. मनावर ताण राहील. धार्मिक कार्यात मन लागेल. विनाकारण खर्च वाढतील. आजचा दिवस उत्साहात जाईल. मित्र परिवारासह बाहेर जाण्यास वेळ काढा. कामे करताना घाईने निर्णय घेऊ नका.

मकर (Capricorn) : हातातील अधिकार योग्य ठिकाणी वापरा. जवळच्या प्रवासात काळजी घ्यावी. आरोग्यात काहीशी सुधारणा संभवते. जोडीदाराचे मत विचारात घ्यावे. मनातील अरसिकता काढून टाकावी. उत्पन्न स्थिर राहील. धोका पत्करू नका. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कंबर दुखी किंवा मानदुखीचा त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे असे झाल्यास दुर्लश्र करु नका. घरातील मंडळींचे आदेश पाळा.

कुंभ (Aquarious) : जोडीदाराशी मतभेदाची शक्यता आहे. घरातील वातावरण शांततापूर्ण ठेवावे. प्रवास जपून करावा. घरगुती कामात अधिक वेळ अडकून पडाल. आर्थिक गणित नव्याने मांडावे लागेल. विद्यार्थ्यांसाठी उत्तम दिवस. विवाहेच्छूक तरुण आणि तरुणींसाठी चांगले स्थळ मिळेल. घरात पाहुणे येतील. तसेच आजच्या दिवशी आराम केल्यास उत्तम. अचानक खर्च वाढू शकतो. घरात थोडे वादाचे वातावरण तयार होईल.

मीन (Pisces) : पित्त विकाराचा त्रास संभवतो. क्षुल्लक कारणाने डोकेदुखी वाढू शकते. घाईघाईने कोणतेही काम करू नका. नातेवाईकांशी मतभेद संभवतात. नवीन लोकांच्यात मिसळावे. उधार दिलेले पैसे परत मिळतील. व्यवसायात उत्पन्न वाढेल. मौल्यवान वस्तू सांभाळून ठेवा. आज प्रेमप्रकरणी चुका होणार नाही याची दक्षता घ्या. घरातील मंडळींचे आदेश पाळा. ताणतणाव कमी करण्यासाठी स्वत:ला वेळ द्या.

Advertisement