SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘स्क्विड गेम’च्या चाहत्यांसाठी खुशखबर! लवकरच ‘या’ सिरीज दुसऱ्या सिझन येणार

नेटफ्लिक्स (Netflix) या प्रसिद्ध OTT प्लॅटफॉर्मने जबरदस्त वेब सीरिजने चाहत्यांच्या मनोरंजनात वाढ करत त्यांना प्रचंड वेड लावलं आहे. नेटफ्लिक्सवरील अनेक लोकप्रिय व बहुचर्चित वेब सीरिजच्या पुढील सिझनसाठी चाहते आतुरतेने वाट बघत आहेत. अशातच नेटफ्लिक्सच्या चाहत्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. नेटफ्लिक्स कडून 2021 मधील सर्वाधिक लोकप्रिय वेब सीरिज ‘स्किड गेम’च्या सिझन 2 ची घोषणा करण्यात आली आहे.

‘स्किड गेम’ या वेब सीरिजने जगभरात स्वत:चा वेगळा चाहता वर्ग निर्माण आहे. आणि आता याच्या दुसऱ्या सिझनसाठी चाहते आतुर होते. त्यानंतर आता नेटफ्लिक्सने ‘स्किड गेम’च्या सिझन 2 ची घोषणा केली आहे. नेटफ्लिसने अधिकृत ट्विटर अकाऊंटवर ‘स्किड गेम’च्या सिझन 2 चा टीझर शेअर केला आहे.

Advertisement

*’स्किड गेम’चा टीझर पाहण्यासाठी* :

*आता चाहत्यांची उत्सुकता शिगेला*
‘स्किड गेम’च्या सीझन 2 च्या घोषणेनंतर चाहते खूप उत्सुक आणि आनंदी झाले आहेत. या पोस्टवर असंख्य़ चाहते खूप कमेंट करत आहे.

Advertisement