दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे.. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज (ता. 17) जाहीर होणार आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली. त्यानुसार, आज दुपारी 1 वाजता हा निकाल ऑनलाईन जाहीर होणार आहे.
गेल्या आठवड्यात बारावीचा निकाल जाहीर झाला होता. त्यानंतर विद्यार्थी-पालकांचे लक्ष दहावीचा निकालाकडे लागले होते. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी 15 जूनपर्यंत दहावीचा निकाल जाहीर केला जाणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, 15 जून उलटून गेल्यावरही निकाल जाहीर न झाल्याने विद्यार्थी चिंतेत पडले होते..
SSC Result 2022 – घरबसल्या निकाल नेमका कसा पाहाल?
दहावीचा निकाल पाहण्यासाठी mahresult.nic.in आणि mahahsscboard.in या दोन वेबसाईटवर भेट द्यावी लागेल. तिथे दिलेली माहिती अपलोड केल्यानंतर तुम्हाला निकाल पाहता येईल.
मात्र, बऱ्याचदा साईट स्लो झाल्याने किंवा नेट उपलब्ध नसल्याने ऑनलाइन निकाल पाहाणं शक्य होत नाही. तर अशावेळी तुम्ही SMS द्वारे निकाल पाहू शकता. तुम्हाला एक SMS करायचा आहे. त्यावर तुमचा सीट नंबर आणि नाव द्यायचं आहे. तुम्ही तो SMS पाठवला की तुम्हाला तुमचा निकाल SMS द्वारेच पाहता येईल.
या फॉरमॅटमध्ये एसएमएस टाइप करा :
*आता दहावीचा निकाल SMS द्वारे हि पाहता येणार*
▪️ सर्वप्रथम तुमच्या मोबाईलच्या मेसेज बॉक्स मध्ये जा.
▪️ स्क्रीनवर देण्यात आलेल्या न्यू मेसेज या पर्यायावर क्लिक करा.
▪️ सर्वात शेवटी MHHSC<space>सीट क्रमांक लिहून 57766 वर पाठवा.
▪️ तुम्हाला तुमचा रिझल्ट अवघ्या काही सेंकदात हातात मिळेल.