SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

दारुच नव्हे, तर ‘या’ गोष्टीही ‘लिव्हर’साठी घातक, ‘अशी’ घ्या काळजी..!

शरीराचा केमिकल फॅक्टरी म्हणजे, यकृत अर्थात लिव्हर.. रक्तातील रसायनांची पातळी राखण्यासाठी यकृत 24 तास काम करीत असते. शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकणाऱ्या या महत्त्वाच्या एकल अवयवाकडे हवं तेवढं लक्ष दिलं जात नाही.. अगदी जिवावर बेतल्यावरच लोकांना मग जाग येते.. (Health tips)

दारुमुळे लिव्हर लवकर खराब होत असल्याचे वारंवार बोलले जाते.. त्यामुळे दारुबाबत अनेकांना माहिती असले, तरी अशा अनेक गोष्टी असतात, त्यामुळे तुमचे लिव्हर खराब होऊ लागते. या कोणत्या सवयी आहेत, याबाबत सविस्तर जाणून घेऊ या..

Advertisement

‘या’ गोष्टींबाबत काळजी घ्या..

साखर
साखरेचे अधिक प्रमाणात सेवन फक्त दातांसाठीच नव्हे, तर यकृतालाही नुकसान पोहोचवू शकते. चरबी बनवण्यासाठी ‘फ्रक्टोज’ नावाची साखर हे यकृत वापरते. ‘रिफाईंड’ साखर व उच्च फ्रक्टोज कॉर्न सिरपचे जास्त सेवन केल्यास यकृत खराब होऊ लागते. अल्कोहोलप्रमाणेच साखरही लिव्हरचे नुकसान करते.

Advertisement

‘अ’ जीवनसत्वाचे अधिक सेवन
शरीराला लागणाऱ्या अनेक जीवनसत्त्वांपैकी एक म्हणजे ‘अ’ जीवनसत्व.. ताजी फळे व भाज्यांमुळे शरीरातील ‘अ’ जीवनसत्वाची कमतरता भरून काढता येते. अनेक जण ‘अ’ जीवनसत्वाची कमतरता भरून काढण्यासाठी ‘सप्लिमेंट्स’ घेतात. मात्र, त्याचा जास्त डोस घेतल्यास यकृताचा आजार होऊ शकतो.

लाल मांस
प्रथिने असलेले लाल मांस (Red Meat) पचवणे यकृताला खूप कठीण जाते. जास्त प्रमाणात प्रथिने असलेले लाल मांस खाल्ल्यामुळे यकृताशी संबंधित रोगांचा धोका वाढतो.

Advertisement

पेनकिलर
डोकेदुखी, शरीर दुखीवर उपाय म्हणून अनेक जण ‘पेनकिलर’ घेतात. मात्र, त्याचे प्रमाण जास्त झाल्यास यकृतावर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे नेहमी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच वेदनाशामक औषधांचे सेवन करा.

टीप : वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे.. डाॅक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा..

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement