SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

अलर्ट : एचडीएफसी बँकेकडून ग्राहकांना महत्त्वाची सूचना

तुम्ही HDFC बँकेचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. देशातील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या एचडीएफसीने आपल्या बँकेच्या ग्राहकांना सर्तकतेचा इशारा दिला असून एचडीएफसी बँकेने अधिकृत ट्वीटर हँडलवर ट्वीट करत पॅन कार्ड डिटेल्स अपडेट करणाऱ्या लिंकवर क्लिक न करण्याचे ग्राहकांना आवाहन केले आहे.

एचडीएफसी बँकेच्या ट्वीट मध्ये काय? : एचडीएफसी ग्राहकांना हॅकर्स कडून एका बोगस एसएमएस पाठवण्यात येत असून एचडीएफसी बँक आपल्या ग्राहकाना कोणत्याही प्रकारची गोपनीय माहिती SMS द्वारे देण्यास सांगत नाही अथवा कोणत्या लिंकवर क्लिक करून माहिती देण्यास सांगितले नाही. बँकेने म्हटले की, बँकेकडून ग्राहकांना अधिकृत क्रमांक 186161 अथवा HDFCBK/HDFCBN या आयडीच्या मार्फत मेसेज पाठवले जात आहे. एसएमएस हा ऑफिशियल डोमेन hdfcbk.io वरून येईल. त्याशिवाय इतर कोणत्याही डोमेनवर क्लिक करू नये असेही आवाहन बँकेने ग्राहकांना केले आहे.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून हॅकर्सकडून ग्राहकांकडून फसवणूक होत असल्याचे अनेक प्रकार समोर आले असून या पार्श्वभूमीवर HDFC बँकेने ग्राहकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

Advertisement