विश्वचषकाच्या तयारीला लागलेला भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात पाच सामान्यांची टी-20 मालिका खेळत आहे. दिग्गज खेळाईच्या अनुपस्थितीत ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला पहिल्या सामन्यात लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे आज रंगणाऱ्या कटकच्या मैदानावर होणारा दूसरा टी-20 सामना भारतीय संघासाठी महत्त्वाचा असणार आहे.
पहिल्या सामन्यात भारतीय संघाची कमकुवत गोलंदाजी पाहता दुसऱ्या टी 20 सामन्यात भारतीय संघात काही बदल होण्याची शक्यता असून हा सामना जिंकून भारतीय संघाला मालिकेत 1-1 अशी बरोबरी करता येणार आहे.
कटक खेळपट्टीचा अंदाज :
आतापर्यंत पाहिले तर कटकची खेळपट्टीही वेगवान गोलंदाजीसाठी पोषक समजली जाते. त्यामुळे यावेळी भारतीय संघ चार वेगवान गोलंदाजांनिशी उतरू शकतो. त्यामुळे या सामन्यात वेगवान गोलंदाज कशी कामगिरी करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.
भारतीय संघात हे दोन बदल होण्याची शक्यता
दुसऱ्या ट्वेन्टी-20 सामन्यात भारतीय संघाता आता दोन बदल होऊ शकतात, असे चित्र दिसत आहे. दुसऱ्या ट्वेन्टी-20 सामन्यासाठी वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह किंवा उमरान मलिक या दोघांपैकी एकाला खेळण्याची संधी मिळू शकते. तर त्याचबरोबर फिरकी गोलंदाजीमध्येही एक बदल होऊ शकतो आणि रवी बिश्नोईला संघात घेण्याची शक्यता आहे.
भारताचा संभाव्य प्लेईंग 11-: ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकिपर), हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, आवेश खान, अर्शदीप सिंह/उमरान मलिक, रवि बिश्नोई.
Advertisement