SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

क्रेडिट कार्ड वापरताय! तर ही बातमी तुमच्यासाठीच

आजकाल आपल्या क्रेडिट कार्ड असणे ही काहींसाठी गर्वाची बाब आहे असंच काही जण वागत असतात. क्रेडिट कार्ड वापरत असताना क्रेडिट कार्डवर इतरही काही शुल्क बँकेकडून आकारले जातात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.

जर समजा आपल्याला एखादा कॉल आला आणि बँक मोफत क्रेडिट कार्ड देत आहे असं म्हटलं गेलं तर समजून जा की एक्झिक्युटिव्ह तुम्हाला चुकीचे सांगत आहे. नवीन क्रेडिट कार्ड युजर असणे हा काही गुन्हा नाही. मात्र क्रेडिट कार्ड हे हुशारीने वापरले तरचं ते आपल्याला परवडू शकते. अन्यथा आपलं नुकसान होणं पक्क आहे.

Advertisement

1) क्रेडिट कार्ड वापरण्याआधी तुम्हाला क्रेडिट कार्डच्या फीचर्स संबंधित माहिती असणे गरजेचे आहे. आपली बँक क्रेडिट कार्डवर कोणते चार्जेस आकारते हे देखील माहिती असायला हवं.

2) क्रेडिट कार्डवर आकारले जाणारे शुल्क हे बँक टू बँक बदलत असते. काही बँका हे शुल्क घेत नाहीत. मात्र एक विशेष रक्कमेची खरेदी करावीच लागेल अशी अट बँकाकडून घातली जाते.

Advertisement

3) काही बँका कार्डशी कोणतेही बिल जोडण्यासाठी वार्षिक शुल्क माफ, फक्त हे माहित असणं गरजेचं आहे. बँक नेहमी आपल्याला सांगत असते की कार्ड मोफत देत आहे, मात्र त्यामागील काही दडलेल्या अटींची माहिती ते देत नाही.

4) जेव्हा आपण एखाद्या मॉलमधून किंवा इतर ठिकाणी क्रेडिट कार्ड वापरतो तेव्हा आपल्याला देय तारखेपर्यंत कोणतेही शुल्क न देता पैसे द्यावे लागतील. मात्र जर आपण कार्ड वापरून रोख रक्कम काढली तर मात्र शुल्क जास्त प्रमाणात आकारले जाते. त्यामुळं शक्य असल्यास, क्रेडिट कार्डमधून पैसे काढणे टाळा.

Advertisement