SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

एक रुपयाचाही खर्च न करता बघा 800 टीव्ही चॅनेल्स फ्री

दिल्ली :

सध्या भारतात दोन उद्योगपतींमध्ये आशिया खंडात सर्वात श्रीमंत कोण आहे? याबद्दल कमालीची लढत सुरु आहे. ही लढत सुरु आहे अदानी कंपनीचे मालक गौतम अदानी आणि रिलायन्स जिओचे मालक मुकेश अंबानी. 2016 साली भारतामध्ये जिओचे सिम आले आणि टेलिकॉम इंडस्ट्रीला हादरा बसला. आता पुन्हा एकदा टेलिकॉम क्षेत्रात आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी जिओ एक धमाकेदार ऑफर घेऊन उतरला आहे.

Advertisement

रिलायन्स आता Jio TVच्या माध्यमातून स्वस्त प्रीपेड प्लान्स आपल्या ग्राहकांना देणार आहे. जिओचा रिचार्ज मारल्यानंतर आपल्याला जिओ टीव्ही फ्रीमध्ये पाहायला मिळते. आपण घरात सेट अप बॉक्सवर जसं टीव्ही चॅनेल्स बघतो अगदी त्याच प्रकारचे चॅनल्स आपल्याला जिओ टीव्हीवर उपलब्ध आहेत. जवळपास 800 चॅनल्स आपण जिओ टीव्हीवर पाहू शकतो. Jio TVवर तुम्हाला सर्च, शेअर, मल्टी लँग्वेज, रिमाइंडर, मिनी प्लेअरसह अनेक फीचर्स मिळतील.

Jio TVतुम्ही अँड्राइड आणि आयओएस या दोन्ही सिस्टीम्सवर पाहू शकता. जिओ टीव्ही ऍपची साईझ अवघी 40 एमबी एवढी आहे. आपण हे ऍप डाउनलोड करून आपल्या मोबाईल फोनमध्ये वापरू शकतो. आपलयाला फक्त आपल्या रेजिस्टर मोबाईल क्रमांकाने यामध्ये लॉग इन करायचे आहे आणि त्यानंतर लगेचच आपण जिओ टीव्हीचा आनंद घेऊ शकतो.

Advertisement

जिओच्या रिचार्जसोबत तुम्हाला जिओ टीव्हीचे सबस्क्रिप्शन मोफत मिळते. जर तुमचा रिचार्ज 84 दिवसांचा असेल तर तुम्ही 84 दिवसांसाठी जिओ टीव्हीचा फुकट आनंद घेऊ शकता. यासाठी कोणतेही अतिरिक्त चार्जेस लागणार नाहीत, याची प्रत्येकाने नोंद घ्यायला हवी.

Advertisement