SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत मोठे बदल, विद्यार्थ्यांचा होणार फायदा…!

बारावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला.. त्यानंतर आता सगळ्यांना वेध लागले आहेत, ते दहावीच्या निकालाचे… येत्या 15 जूनपर्यंत हा निकाल जाहीर होणार असल्याचे सांगितले जात आहे.. मात्र, निकालानंतर एकाच वेळी गोंधळ होऊ नये, यासाठी अकरावीची प्रवेश प्रक्रिया आधीच सुरु करण्यात आली आहे..

दरवर्षी अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत गोंधळ पाहायला मिळतो. त्यावरुन पालकांनी अनेकदा नाराजीही व्यक्त केली आहे. त्याची दखल घेऊन यंदाच्या अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत काही महत्वाचे बदल करण्यात आले आहेत.

Advertisement

यंदाची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया अतिशय सोपी व सुटसुटीत करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येणार नसल्याचा दावा करण्यात येत आहे.. यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत नेमके काय बदल करण्यात आले आहेत, याबाबत जाणून घेऊ या..

अकरावी प्रवेश प्रक्रियेतील बदल

Advertisement

गुण समान असल्यास…
दहावीच्या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांना समान गुण असल्यास, अकरावीला प्रवेश देताना जन्मतारखेनुसार ज्येष्ठ विद्यार्थ्याला आधी प्रवेश मिळेल, जन्मतारीखही समान असल्यास विद्यार्थ्याचे पूर्ण नाव (नाव, वडिलांचे नाव, आडनाव) इंग्रजीत घेऊन त्या वर्णाक्षरांच्या क्रमानुसार क्रम ठरविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे समान गुणामुळे प्रवेशाची अडचण येणार नाही.

कोणत्याही टप्प्यावर प्रवेश
सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गाकरिता (एसईबीसी) सामान्य प्रशासन विभागाच्या 5 जुलै 2021 च्या निर्णयाप्रमाणे कार्यवाही करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. तसेच, ‘इन हाऊस’ कोट्यांतर्गत कोणत्याही टप्प्यावर प्रवेश करण्याची व प्रत्यार्पित करण्याची सुविधा असेल.. तशा सूचना सहसचिव इ. मु. काझी यांनी दिल्या आहेत.

Advertisement

एका फेरीसाठी प्रतिबंधित
अनेकदा प्रथम पसंतीक्रम मिळाल्यानंतरही अनेक विद्यार्थी प्रवेश घेत नसत.. तसेच प्रवेश रद्द करणारे विद्यार्थी किंवा महाविद्यालयाने प्रवेश नाकारलेल्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत नियमित फेऱ्यांसाठी प्रतिबंधित केलं जात होतं. या विद्यार्थ्यांना थेट चौथ्या विशेष फेरीत संधी मिळत असे. मात्र, आता त्यात बदल करण्यात आला आहे..

पहिल्या पसंतीचे कॉलेज मिळाल्यानंतरही प्रवेश घेतला नाही, तर त्या विद्यार्थ्यांना पुढच्या सगळ्या फेऱ्यांमधून बाहेरचा रस्ता दाखवला जाणार नाही. फक्त पुढच्या एका फेरीत त्याला प्रवेश मिळणार नाही. त्यानंतर पुढच्या सगळ्या फेऱ्यांमध्ये त्याला प्रवेशाची संधी मिळणार आहे. अर्थात, त्यासाठी त्याला प्रत्येक वेळी नव्याने अर्ज करावा लागणार आहे.

Advertisement

‘या’ गावांचाही समावेश
ठाणे, पालघर व रायगड जिल्ह्यांतील गावे, मुंबई महानगर विकास प्राधिकरण क्षेत्रातील वसई व भिवंडी तालुका व पनवेल (ग्रामीण) हा भाग, तसेच पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील मोशी, चऱ्होली, चिखली, दिघी, डुडूळगाव येथील महाविद्यालयांना ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येत नव्हते. मात्र, यंदा या गावांचाही प्रवेश प्रक्रियेत समावेश करण्याच्या सूचना शासन निर्णयात देण्यात आल्या आहेत.

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement