SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

पदवी शिक्षणाला जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी ही बातमी वाचाच; 12वी नंतर कला शाखेत ‘या’ आहेत संधी

मुंबई :

नुकताच महाराष्ट्र बोर्डाचा 12 वी (Maharashtra HSC Results 2022 Declared) निकाल जाहीर करण्यात आला आहे. कोरोनाच्या महामारीनंतर यंदा ऑफलाईन पेपर घेण्यात आले होते. असं जरी असलं तरी राज्याच्या निकाल नेहमीप्रमाणे चांगला लागला आहे. यंदाच्या वर्षी निकाल 94.22 इतका लागला आहे. आपल्याकडील शिक्षण व्यवस्थेमध्ये 10वी आणि 12वी ला विशेष महत्व दिले जाते. 12 वी नंतर आपल्याला कोणत्या क्षेत्रात जायचे आहे हे ठरवले जाते. अभियांत्रिकी असो किंवा इतर पदवी असो, सगळ्यांना पूर्ण करण्याचा रस्ता हा 12 वी निकालांवर अवलंबून असतो.

Advertisement

बारावीनंतर बरेच विद्यार्थी हे कला शाखेत आपलं नशीब आजमावू इच्छितात मात्र घरच्यांच्या दबावामुळे किंवा इतर गोष्टींमुळे त्यांना कलाशाखेत कसं करियर करायचं याबाबत माहिती नसतं कला शाखेतून देखील आपण चांगलं करियर करू शकतो. बारावीनंतर कला शाखेत ऍडमिशन घेऊन आपण B.A. Economics, B.A. Political Science, B.A. History, B.A. Geography, B.A. Marathi Literature, B.H.M. (बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ), B.M.M. (बॅचलर इन मास मीडिया), फॅशन डिझायनिंग, होम सायन्स, इंटिरियर डिजाइनिंग,ग्राफिक डिझाईन, ट्युरिझम कोर्स यांसारख्या क्षेत्रात चांगलं करिअर घडवू शकतो.

सध्या भारत हा विकसनशील देश म्हणून कार्य करत आहे आणि आगामी काळात महासत्ता होण्याची स्वप्न देखील आपल्या देशाने बाळगलं आहे. अशा परिस्थितीमध्ये सध्याच्या घडीला आणि पुढच्या काळातही रोजगाराच्या मोठ्या संधी आर्ट क्षेत्रात असणार आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे.

Advertisement

प्रत्येकानेच अभियंता किंवा डॉक्टर होणे गरजेचे नाही. त्यामुळे आता विद्यार्थ्यांनी आर्ट सारख्या क्षेत्रात जिथं कमालीच्या संधी उपलब्ध आहेत अशा क्षेत्रात शिक्षण घ्यावं.

Advertisement