नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.. बीएमसी.. अर्थात बृहन्मुंबई महानगरपालिकेत काही जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे. या भरतीसाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.. इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यासाठी अंतिम तारखेपूर्वी अर्ज पाठवावा लागणार आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेत (BMC Mumbai Recruitment 2022) होणाऱ्या या नोकरभरतीबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ या..
एकूण जागा – 113
या पदासाठी भरती- समुदाय संघटक (कम्युनिटी ऑर्गनायझर)
नोकरीचे ठिकाण – मुंबई
शैक्षणिक पात्रता
- पदवीधर / बीए सोशालॉजी BA Sociology)
- सामाजिक क्षेत्रातील स्वयंसेवी संस्थेत किमान 2 वर्षे काम केल्याचा अनुभव
- मराठी टंकलेखन प्रति शब्द 30 व इंग्रजी टंकलेखनाचे 30 शब्द प्रमाणपत्र असल्यास प्राधान्य
- एमएस-सीआयटी उत्तीर्ण
- मराठीचे ज्ञान आवश्यक
वयोमर्यादा
- खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
- राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे
पगार – 20000 रुपये दरमहा
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता – सहाय्यक आयुक्त (नियोजन) यांचे कार्यालय, 5 वा मजला, जनता क्लॉथ मार्केट इमारत, हॉकर्स प्लाझा, सेनापती बापट मार्ग, दादर (प), मुंबई-400028.
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख – 28 जून 2022
अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – portal.mcgm.gov.in