SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘आयपीएल’ प्रसारण हक्कासाठी कोटींच्या कोटी उड्डाणे, ‘बीसीसीआय’ होणार मालामाल..!

इंडियन प्रीमियर लिग अर्थात ‘आयपीएल’… जगातील सर्वात मोठ्या लिगपैकी एक..! या लिगच्या पुढील 5 वर्षांच्या ‘मीडिया राइट्स’साठी आज (रविवारी) ई-लिलाव प्रक्रिया सुरू झाली. यंदा या ई-लिलाव प्रक्रियेत तगड्या कंपन्या सहभागी झाल्याने भारतीय क्रिकेट मंडळ (बीसीसीआय) मालामाल होणार, हे नक्की..!

‘आयपीएल’च्या प्रसारण हक्कासाठी ‘डिज्ने+स्टार’, ‘सोनी नेटवर्क’, ‘रिलायन्स व्हिकॉम-18’ व ‘झी’ यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. आतापर्यंत या लिलावात 43,050 हजार कोटींपर्यंत बोली लागली आहे. प्रति मॅच विचार केल्यास, या कंपन्यांनी 100 कोटी रुपये प्रत्येक मॅचसाठी मोजण्याची तयारी दर्शवल्याचे दिसते. विशेष म्हणजे, ही बोली अजूनही वाढत जाणार आहे..

Advertisement

‘आयपीएल’च्या ई-लिलाव प्रक्रियेतून ‘अॅमेझाॅन’ (Amazon) व ‘गुगल’ (Google) यांनी आधीच माघार घेतली असली, तरी इतर 4 कंपन्यांमध्ये मोठी स्पर्धा सुरु आहे. फक्त ‘डिजिटल राईट्स’साठी ‘झी’ मीडिया कंपनी उत्सुक असल्याचे समजते. मात्र, या कंपनीसमोर ‘डिज्ने हाॅटस्टार’चे तगडे आव्हान असणार आहे..

‘बीसीसीआय’ने यंदा ‘आयपीएल’च्या प्रसारण हक्काचे चार गटांत वर्गीकरण केलंय.. म्हणजेच, हे सामने प्रसारित करणारी माध्यमं वेगवेगळी असणार आहेत. त्यासाठी माध्यम कंपन्यांना वेगवेगळी रक्कम मोजावी लागणार आहे. ते खालीलप्रमाणे :

Advertisement
  • पॅकेज ‘ए’ : भारतीय उपखंड (टिव्ही)- 49 कोटी (प्रत्येक सामन्यासाठी)
  • पॅकेज ‘बी’ : भारतीय उपखंड (डिजिटल)-  33 कोटी (प्रत्येक सामन्यासाठी)
  • पॅकेज ‘सी’ : प्रत्येक सत्रात 18 निवडक सामन्यांच्या डिजिटल प्रसारणाचे अधिकार, 11 कोटी (प्रत्येक सामन्यासाठी)
  • पॅकेज ‘डी’ : भारतीय उपखंडाबाहेरील देशांमध्ये टीव्ही आणि डिजिटल दोन्ही प्रसारणाचे अधिकार (33 कोटी)

यंदा ‘आयपीएल’मध्ये 10 संघांचा समावेश झाल्याने 74 सामने झाले. मात्र, 2026 व 2027 च्या सत्रासाठी ‘बीसीसीआय’ सामन्यांची संख्या 94 पर्यंत वाढवण्याच्या विचारात आहे. तसे झाल्यास ‘बीसीसीआय’ची कमाई आणखी वाढणार आहे..

प्रति मॅच 100 कोटींची तयारी
ई-लिलावाला आज (रविवारी) सकाळी 11 वाजता सुरूवात झाली. त्यात दुपारी साडेतीन वाजेपर्यंत पॅकेज ‘ए’ व ‘बी’साठी कंपन्यांनी 42 हजार कोटींपर्यंत बोली लावली होती. त्यानुसार, प्रति मॅच 100 कोटी रुपये मोजण्याची तयारी या कंपन्यांनी दर्शवली आहे.

Advertisement

‘डिजिटल राईट्स’चे (Digital Rights) मूल्य 19 हजार कोटी, तर ‘लाईव्ह ब्राॅडकास्ट’ (LIVE Broadcast)चे मूल्य हे 24 हजार कोटी लावलेय. त्यामुळे हा आकडा 43 हजार कोटींवर पोहोचला आहे. मागच्या लिलावात ‘स्टार’ कंपनीने प्रती मॅच 54.5 कोटी रुपये मोजले होते.. आता त्याची किंमत 100 कोटींवर पोहोचली आहे.

आतापर्यंतचा लिलाव
‘आयपीएल’ला 2008 साली सुरुवात झाली, तेव्हा ‘सोनी’ कंपनीने 10 वर्षांसाठी टीव्ही प्रसारणाचे हक्क 8200 कोटींना विकत घेतले होते. नंतर 2017 ते 2022 साठी ‘स्टार स्पोर्ट्स’ने 16,347 कोटी रुपयांची बोली लावताना टीव्ही व डिजिटलचे प्रसारणाचे हक्क मिळवले होते. आता 5 वर्षांसाठी (2023-27) प्रसारण हक्क विकले जाणार आहेत.

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement