SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

WhatsApp देणार प्रत्येकाला 105 रुपयांचा कॅशबॅक

आपला सगळ्यांना आवडणारे आणि ज्या ऍपवर आपण तासंतास इतरांसोबत गप्पा मारतो, असे व्हॉट्सअ‍ॅप आता आपल्याला कॅशबॅक देणार आहे. मागील काही दिवसांपूर्वी WhatsApp Payच्या माध्यमातून व्हॉट्सअ‍ॅपने ऑनलाईन व्यवहार सुरु केले आहेत. WhatsApp Pay वापरणाऱ्यांची संख्या आता लाखोंच्या घरात पोहोचली आहे. WhatsApp Pay वापरणाऱ्या युझर्सना खुश करण्यासाठी आता कॅशबॅक दिला जाणार आहे. जो युझर WhatsApp Payचा उपयोग करून व्यवहार करेल, त्याला 105 रुपयांचा कॅशबॅक मिळणार आहे.

WhatsApp Payचा उपयोग जास्तीत जास्त युझर्सनी करावा यासाठी ही शक्कल वापरण्यात येत आहे. भारतात सध्या ऑनलाईन पेमेंटसाठी Google Pay, Phone Pe आणि Paytm सारखे ऍप्स मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. यासोबतच आता amazon payचा वापरही वाढत चालला आहे. या सर्व ऑनलाईन पेमेंट करणाऱ्या ऍप्सना टक्कर देण्यासाठी WhatsApp Pay कॅशबॅक ऑफर देत आहे.

WhatsApp Pay यूजर्सला त्याच्या पुढील तीन पेमेंटसाठी 105 रुपयांचा कॅशबॅक देणार आहे. यासोबतच मेसेजिंग प्लॅटफॉर्म यूजर्सला त्यांच्या पुढील तीन पेमेंटसाठी 35 रुपये कॅशबॅक देणार आहे. WhatsApp Pay, WhatsApp च्या माध्यमातून पेमेंट केल्यानंतर हा कॅशबॅक मिळणार आहे. यासाठी आपण 1रुपयांपासून तर पुढे कितीही रक्कम पाठवू शकता. यासोबतच कंपनीने जाहीर केले आहे की कॅशबॅकची ऑफर ही मर्यादित काळासाठी आणि ठराविक ग्राहकांसाठीच उपलब्ध असणार आहे. WhatsApp वापरत असतानाच आपल्याला आता एका कोपऱ्यामध्ये रुपयाचं चिन्ह दिसतं. तिथं क्लिक केल्यानंतर लगेचच आपण बँक खाते जोडावे लागेल. बँक खाते जोडल्यानंतर मोबाइल नंबर व्हेरिफाय करावा लागेल. यानंतर ‘Continue’ पर्यायावर क्लिक करून पुढे पेमेंट करण्यासाठी आपण सुरुवात करू शकता.

Advertisement