SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

पावसाळ्यात बदला जीवनशैली, आरोग्याबाबत ‘अशी’ घ्या काळजी…!

माॅन्सून महाराष्ट्राच्या वेशीवर दाखल झाला असून, महाराष्ट्रात ठिकठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे. दर वर्षी पावसाळा आला की सोबत काही आजार घेऊनच येतो.. त्यात राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात जादा काळजी घेण्याची गरज आहे..

खरं तर पावसाळा सर्वांचा आवडता ऋतू. मात्र, त्याच वेळी या काळात अनेक संसर्गही पसरतात. शिवाय, बदलत्या हवामानाचाही शरीरावर परिणाम होत असतो. अशा वेळी नागरिकांनीही आपल्या जीवनशैलीत काही बदल करणं गरजेचं असतं.. त्यासाठी नेमकं काय करायला हवं, याबाबत जाणून घेऊ या..

Advertisement

‘अशी’ घ्या आरोग्याची काळजी..!

– पावसाळ्यात शक्यतो कॉटनचे कपडे घाला. विणलेला टी-शर्ट, टॉप आणि कुर्ती हे उत्तम पर्याय आहेत. कॅप्री, स्कर्ट, ट्यूनिक, लाँग फ्रॉकही परिधान करता येईल.
– चामड्याचे शूज किंवा सँडलचा वापर करु नका. त्याऐवजी स्टायलिश चप्पल, सँडल किंवा रबर आणि प्लास्टिकचे शूज घातले तरी चालेल..

Advertisement

– दागिन्यांमध्ये हलके आणि सुंदर प्लास्टिकचे मणी असावेत. जड दागिने पावसाळ्यात घालू नका.
– पावसाळ्यात रोज केस धुवायला हवेत. शक्यतो सौम्य शाम्पूने केस धुवा. प्रत्येक वॉशनंतर चांगल्या दर्जाचे कंडिशनर वापरा. केस गळणार नाहीत किंवा ते कोरडे व निर्जीव होणार नाहीत, याची काळजी घ्या.

– ओल्या केसांमध्ये उवा होण्याचा धोका असतो, त्यामुळे पावसामुळे डोके ओले झाल्यास शॅम्पू करावा.
– पावसाळ्यात चिकट त्वचेपासून सुटका मिळवण्यासाठी चंदन पावडर व गुलाब पाणी एकत्र करून चेहरा, मान आणि हातावर लावा .

Advertisement

– खोबरेल तेलात थोडी पावडर मिसळा व मानेवर आणि आसपासच्या भागात लावा.
– गुळगुळीत त्वचेसाठी मध व लिंबाचा रस एकत्र करून त्वचेवर लावू शकता. त्यामुळे त्वचा मुलायम व तजेलदार राहते..

– पावसाळ्यात जास्त थंड पाणी आणि कोल्ड्रिंकचा मोह टाळावा. तसेच हलका व पौष्टिक आहार घ्या. या दिवसात पालक, मुळा, कांदे व लसूण खाणे टाळावे. तसेच सुका मेवा खाण्याचे प्रमाणही कमी करणं आवश्यक असतं..

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement