SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

मोबाईल रिचार्जसाठी जादा पैसे मोजावे लागणार, ‘या’ पेमेंट अ‍ॅपचा युजर्सना धक्का..!!

कोणाला पेमेंट करायचे असो, माेबाईल-टिव्हीचा रिचार्ज असो वा एखादे बिल भरायचे असो.. डिजिटल वाॅलेटमुळे ही कामे अगदी काही सेकंदात होऊ लागली आहेत. शिवाय, खिशात कॅश ठेवण्याचीही गरज राहिली नाही.. पुढील वर्षभरात ‘ई-कॉमर्स पेमेंट’साठी डिजिटल वॉलेट्सचा वापर रोख व्यवहारांना पिछाडीवर टाकण्याचा अंदाज आहे..

डिजिटल वॉलेट्समधील एक मोठं नाव म्हणजे, अर्थातच ‘पेटीएम’… या डिजिटल पेमेंट अॅपमुळे नागरिकांची मोठी सोय झाली असली, तरी आता हे वाॅलेट वापरताना ग्राहकांना दहा वेळा विचार करावा लागणार आहे..

Advertisement

‘पेटीएम’ने (Paytm) आपल्या यूजर्सना मोठा झटका दिला आहे. ‘पेटीएम’ खात्यातून यापुढे कोणताही मोबाइल रिचार्ज करायचा असेल, तर ग्राहकांना आता त्यावर अधिकचा कर भरावा लागणार आहे. मोबाईल रिचार्जवर ‘पेटीएम’कडून अधिकचा कर आकारण्यात येत आहे. आधीच मोबाईल रिचार्जच्या किंमती वाढल्या असताना, ‘पेटीएम’मुळे आणखी खर्च वाढणार आहे.

‘पेटीएम’कडून हा अधिकचा कर ‘पेटीएम वॉलेट बॅलन्स’ किंवा ‘युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस’ (UPI), ‘बँक क्रेडिट’ किंवा डेबिट कार्डसारख्या सर्व पेमेंटवर लावला जात आहे. तो 1 ते 6 रुपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे.. हा अधिक भार 100 रुपयांवरील सर्व व्यवहारांवर लागू असणार आहे.

Advertisement

‘फोन-पे’कडूनही अधिक कर

‘फोन-पे’ (Phone-Pe)ने मोबाईल रिचार्जवर अधिकचा कर आकारण्यास आधीच सुरुवात केली आहे. आता ‘पेटीएम’ ग्राहकांवर अधिकचा कर आकारत आहे. अर्थात, रिचार्ज करताना या अधिक भाराच्या सुचना ग्राहकांना आधीच दिली जाते. सुविधा शुल्क म्हणून ‘पेटीएम’ने अधिक भार आकारण्यास सुरुवात केल्याचे ग्राहकांनी सांगितले..

Advertisement

विशेष म्हणजे, 2019 मध्ये ‘पेटीएम’ने एक ट्विट केलं होतं, त्यात ‘यूपीआय’ किंवा वाॅलेटसह कोणत्याही प्रकारच्या पेमेंटसाठी ग्राहकांकडून कोणताही सुविधा कर किंवा व्यवहार शुल्क घेणार नसल्याचे ‘पेटीएम’कडून सांगण्यात आलं होतं. मात्र, महसूल वाढीसाठी ‘पेटीएम’ने ग्राहकांवर अधिक भार आकारण्यास सुरुवात केलीय.

‘पेटीएम’च्या आधी ‘फोन-पे’कडून ऑक्टोबरमध्ये अधिक भार आकारण्यास सुरुवात करण्यात आली होती. मात्र, कोणत्या कारणास्तव ते अधिकभार आकारत आहेत, याबाबत दोन्ही कंपन्यांनी स्पष्टीकरण दिलेले नाही.. त्यामुळे ग्राहकांचा खिशा रिकामा होणार, हे मात्र नक्की..!!

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement